टी20 विश्वचषकाचा महासंग्राम येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पुरूष क्रिकेट संघांचा हा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup)असणार आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळली जाणार आहे. या स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये भारताबरोबर यजमान संघ ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी जवळपास दोन आठवड्याआधीच ऑस्ट्रेलियात पोहोचणार आहे. यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डने अधिक सराव सामने खेळण्याची इच्छा दर्शवली होती.
भारताचा टी20 विश्वचषकातील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. त्याआधी भारत दोन सराव सामने खेळणार आहेत. त्यातील पहिला सामना 17 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि 19 ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. हे दोन्ही सामने ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. या स्पर्धेतील काही संघ प्रत्येकी दोन सराव सामने खेळणार आहे, मात्र भारताच्या सराव सामन्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
दोन्ही सराव सामना ब्रिसबेन येथेच खेळले जाणार असल्याने भारत ब्रिसबेन येथेच काही दिवसाचा तळ ठोकणार असल्याचे वृत्त समोर येत आहेत. रिपोर्ट्सनुसार या छोट्या कॅम्पमध्ये भारत सराव अभ्यास आणि काही अंतर्गत सामने खेळणार आहेत. तसेच भारताला अधिक सराव सामने खेळू द्या अशी मागणी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केली होती. त्यानुसार भारताला बाकी संघांपेक्षा अधिक सराव करण्याची संधी मिळणार आहे. याआधी भारताच्या या कॅम्पचे ठिकाण पर्थ होते.
मागील टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान संघात सुपर 12 मध्ये लढत झाली होती. त्यावेळी पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सने पराभूत केले होते आणि भारतावर विश्वचषकात पहिल्यांदाच विजय मिळवण्याचा कारनामा केला होता. आता या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न भारत 23 ऑक्टोबरला करेल, तर पाकिस्तान गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही कामगिरी करण्याच्या हेतूने मैदानात उतरेल.
या विश्वचषकात 16 ऑक्टोबर रोजी पहिल्या फेरीतील पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात पार पडेल. याच दिवशी पात्रता फेरीतून पहिल्या फेरीत प्रवेश केलेल्या संघांमध्येही सामना होणार आहे. सुपर 12 फेरीला 22 ऑक्टोबरला सुरुवात होणार असून पहिलाच सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडेल. हे दोन्ही संघ 2021 टी20 विश्वचषकात अंतिम सामन्यात आमने-सामने होते.
टी20 विश्वचषकासाठी भारताचा मुख्य़ 15 सदस्यांचा संघ जाहीर झाला आहे, मात्र यामध्ये जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याबाबतचे अधिकृत वृत्त बीसीसीआयने अद्याप जाहीर केलेले नाही.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह (अनिश्चित), भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजा आणि मांजरेकरांमधील वाद मिटला! अष्टपैलू खेळाडूने शेअर केली खास पोस्ट
जसप्रीत बुमराहला दुखापत होणार, हे अख्तरला आधीच माहीत होते! जुना व्हिडिओ होतोय व्हायरल
INDvSA: जसप्रीत बुमराहची ‘रिप्लेसमेंट’ मोहम्मद सिराजची टी20 आकडेवारी थक्क करणारी