यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील 19वा सामना (ICC T20 World Cup) भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला गेला. न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगला होता. या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 6 धावांनी धूळ चारत विजय मिळवला. या सामन्यानंतर पाकिस्तान फॅन्स खूप नाराज दिसले. या संबंधितच एक वाईट बातमी समोर आली आहे की, कराचीमध्ये एका पाकिस्तानी यूट्युबरला सिक्युरिटी गार्डनं गोळी मारुन त्याचा खून केला. हा यूट्युबर पाकिस्तान सामना हारल्यानंतर व्हिडीओच्या माध्यमातून लोकांचं मत जाणून घेत होता.
पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार साद अहमद नावाचा यूट्युबर कराचीमध्ये मोबाईल मार्केटमध्ये गेला होता. यादरम्यान त्यानं भारत-पाकिस्तान सामन्यानंतर अनेक दुकानदारांच्या व्हिडिओ, बाइट घेतल्या. परंतु तो मधूनच एका सिक्युरिटी गार्डसमोर गेला आणि भारत-पाकिस्तान सामन्यावर त्याचं मत विचारु लागला. पण त्या सिक्युरिटी गार्डला यामध्ये काही रस नव्हता. त्यानंतर त्यानं सरळ साद अहमद नावाच्या यूट्युबरवर गोळी झाडून त्याच्या खून केला.
गोळी लागल्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले परंतु डाॅक्टरांनी त्याचं मृत झाल्याचे सांगितले. जिओ टीव्हीच्या एका बातमीमध्ये साद अहमदच्या एका मित्रानं सांगितलं की, तो त्याच्या कुटुंबामध्ये पैसे कमावणारा एकटा होता. तो दोन मुलांचा वडील होता. या प्रकरणानंतर कराचीमधील वातावरण भीतीदायक झाले होते.
एआरवायच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी सांगितल की, अहमद गुल नावाच्या सिक्युरिटीचं वय 35 वर्षे होतं, ज्यानं साद अहमद नावाच्या 24 वर्षीय तरुणावर गोळी झाडली. यादरम्यान तो कराचीमध्ये व्हिडीओ बनवत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सिक्युरिटी गार्डनं त्या यूट्युबरला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्याच्यावर गोळी झाडली. या प्रकरणानंतर सिक्युरिटी गार्डला अटक करण्यात आली. परंतु पोलिसांनी चोकशी केल्यानंतर तो म्हणाला, साद अहमद हा युट्यूबर व्हिडीओ बनवण्याच्या वेळी त्याच्याकडे इशारे करत होता.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! कॅनडाच्या खेळाडूंना पंजाबी बोलणं पडतं महागात
पॅरिसमध्येही एमएस धोनीची क्रेझ! चाहता भेटता क्षणीच पडला पाया
यांच्यासाठी वय हा फक्त आकडा! टी20 विश्वचषकातील 4 सर्वात वयस्कर खेळाडू, ज्यांचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे