विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघांच्या यादीत रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अव्वलस्थानी राहिला. भारताने साखळी फेरीतील 9 आणि एक उपांत्य सामना जिंकून अंतिम सामन्यात जागा मिळवली होती. मात्र, एका खराब दिवसामुळे भारतीय संघाचे चॅम्पियन बनण्याचे स्वप्न तुटले. संपूर्ण स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाचे जगभरातील क्रिकेट दिग्गजांनी कौतुक केले होते. मागील काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाची समीक्षा केली आणि पुढील योजनांवर विचार केला. मात्र, अद्याप हे ठरले नाही की, आगामी टी20 विश्वचषक 2024मध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल? अशात सचिव जय शाह यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेनंतर कोणताही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला नाहीये. तसेच, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हादेखील विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघातून बाहेर आहे. अशात सध्या टी20 संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याकडे आहे. बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांनी डब्ल्यूपीएल 2024 लिलावादरम्यान (WPL 2024 Auction) भारताच्या टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत भारताचा कर्णधार कोण असणार, याविषयी मोठी माहिती दिली.
सचिवांनी शनिवारी (दि. 9 डिसेंबर) मुंबईत डब्ल्यूपीएल लिलावादरम्यान म्हटले की, “विश्वचषक जूनमध्ये सुरू होत आहे. त्यापूर्वी आमच्याकडे आयपीएल आणि अफगाणिस्तानविरुद्धची (जानेवारीत) मालिका आहे. आम्ही एक चांगला निर्णय घेऊ.”
Jay Shah said "What is the need to have clarity right now? It (T20 World Cup) is starting in June, we have the IPL before that and the series against Afghanistan".
[Express Sports – About the speculation Rohit Sharma leading the T20 World Cup 2024] pic.twitter.com/kwHMtKxld8
— Johns. (@CricCrazyJohns) December 10, 2023
तसेच, रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत टी20 संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिकच्या फिटनेसविषयी जय शाह म्हणाले की, “आम्ही प्रत्येक दिवशीच्या त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. तो एनसीएमध्ये आहे आणि खूप मेहनत घेत आहे. तो अफगाणिस्तान मालिकेपूर्वीही फिट होऊ शकतो.”
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. रोहित आणि विराट कोहली (Virat Kohli) यांसारखे वरिष्ठ खेळाडू या दौऱ्यात मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळणार नाहीयेत. भारतीय संघ या दौऱ्यात 3 वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळेल. टी20 संघाचे नेतृत्व सूर्याकडे आहे, तर वनडे आणि कसोटीचे नेतृत्व अनुक्रमे केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्याकडे आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकूण 32 खेळाडूंची निवड केली आहे, ज्यातील 3 खेळाडू असे आहेत, जे टी20, वनडे आणि कसोटी या तिन्ही संघात आहेत. (t20 world cup 2024 who will be the captain of india jay shah said this know here)
हेही वाचा-
आता इंग्लंडची खैर नाही! निवडकर्त्यांनी 2 वर्षांनंतर दिली ‘या’ विस्फोटक फलंदाजाला टी20 संघात एन्ट्री, वाचा
INDWvsENGW: अवघ्या 80 धावांवर सर्वबाद होताच हरमनप्रीतची आगपाखड, पराभवानंतर म्हणाली, ‘आमचे फलंदाज ना…’