टी-20 विश्वचषक 2026 भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होत असून, अंतिम सामना (8 मार्च) रोजी खेळवला जाईल. या स्पर्धेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या प्राथमिक संघाची घोषणा केली आहे. संघात नवीन कर्णधाराची एन्ट्री झाली असून, अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. श्रीलंकेने 2014 साली टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते.
टी-20 विश्वचषक 2026 साठी चरित असलंका याच्या जागी दासुन शनाका याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. फलंदाज म्हणून असलंकाची कामगिरी खालावल्यामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो सातत्याने आपल्या फलंदाजीने निराशाजनक कामगिरी करत होता.
टी-20 विश्वचषक 2026 पूर्वी पाकिस्तानचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. मालिकेतील पहिला सामना (7 जानेवारी) रोजी, तर दुसरा सामना 9 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. याशिवाय, तिसरा टी-20 सामना 11 जानेवारी रोजी होईल. या मालिकेनंतर श्रीलंका संघ टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी मैदानात उतरेल.
श्रीलंकेचा संभाव्य संघ:
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कामिल मिशारा, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, निरोशन डिकवेला, जेनिथ लियानगे, चरिथ असलंका, कामिंडु मेंडिस, पवन रथनायके, सहान अराचिगे, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे, मिलन रथनायके, नुवान तुषारा, ईशान मलिंगा, दुष्मंथा चमीरा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना, दिलशान मदुशंका, महेश थीक्षाना, दुशान हेमंथा, विजयकांत व्यासकांत आणि ट्रॅवीन मॅथ्यू.






