एकेकाळी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया हरेल असं वाटत होते, पण त्यानंतर बुमराह आणि हार्दिकने आपल्या गोलंदाजीत अशी जादू केली की, पाकिस्तानच्या हातातून भारताने सामना हिसकावून घेतला. या विजयानंतर संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये नक्कीच आत्मविश्वास वाढला आहे. तर राखीव खेळाडूंनीही हा विजय वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा काही मोठी नावे राखीव खेळाडूंच्या यादीत होती. अशा परिस्थितीत चाहत्यांनी यावर प्रश्नही उपस्थित केले होते, पण आता संघाच्या सलगच्या विजयामुळे हे प्रश्न मागे पडले आहेत. मात्र, यावेळी रिंकू सिंग व्यतिरिक्त शुबमन गिल आणि आवेश तसेच खलील अहमद 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंच्या यादीत आहेत.
टीम इंडियाच्या विजयानंतर खलील अहमदने इन्स्टा स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये रिंकू,आवेश आणि खलीलच्या आनंदाला सीमा नव्हती, इंडियाच्या विजयामुळे रिंकू,आवेश, आणि खलील खूप आनंदीत होते. राखीव खेळाडू असल्याने तिन्ही खेळाडू सामान्य चाहत्यांप्रमाणे स्टँडवर बसले होते.
भारतीय संघ आगामी टी20 विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे, त्याप्रमाणे टीम इंडिया आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे. भारताने साखळी सामन्यात सलग दोन सामने जिंकला आहे. याशिवाय, कर्णधार रोहित अजूनही 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये पराभूत झाल्यामुळे दुःखी आहे. दुसरीकडे, टीम इंडियाने शेवटचे 2013 मध्ये आयसीसीचे विजेतेपद जिंकले होते, त्या वर्षी टीमने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि त्यानंतर टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. तर यावेळी रोहितसेना टीमइंडिया आयसीसी ट्राॅफीचा वनवास मिटवणार का? हे पाहणं योग्य राहिल.
महत्तवाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्याने विकले चक्क ट्रॅक्टर, हाती मात्र निराशाच
पाकिस्तानविरुद्ध भारताने रचला इतिहास, 120 धावांचा बचाव करुन केला मोठा विक्रम!
टीम इंडियाच्या विजयानंतर जय शहांचा आनंद गगनात मावेना! केले अनोखे सेलिब्रेशन, पाहा VIDEO