चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. उभय संघांतील हा सामना रविवारी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. सामना पाहण्यासाठी एक लाख चाहते येणार असल्याचे सांगितले गेले आहे. पण या सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याची शक्यता देखील आहे. कारण हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसामुळे सामना रद्द होऊ शकतो. आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने हवामान अंदाजाविषयी एक मजेशीर उत्तर दिले आहे.
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये जेव्हा कधी आमना सामना होतो, तेव्हा चाहत्यांमध्ये त्याविषयी उत्सुकता असणे सहाजिक आहे. कारण हे दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. याच कारणास्तव रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर देखील चाहते मोठ्या प्रमाणात हजेरी लावणार आहेत. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामन्यादरम्यान मेलबर्नमध्ये जोरदार पाऊस येऊ शकतो आणि सामना देखील रद्द करावा लागू शकतो. असे असले तरी, चाहते आणि त्याचसोबत दोन्ही संघांतील खेळाडूंना सामना होईल, अशीच अपेक्षा आहे.
भारताविरुद्धच्या या सामन्याच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) माध्यमांशी बोलत होता. यावेळी एका पत्रकाराने त्याला एक गमतीशीर प्रश्न विचारला, त्यावर बाबरने देखील जबरदस्त उत्तर दिले. पावसाच्याच्या भितीने पाकिस्तानी खेळाडू अंगाई गीत गात आहेत का? असा प्रश्न विचारला. पत्रकार म्हणाला की, “बाबर सामन्याला पावसामुळे धोका आहे. तुम्ही सर्वजण ‘रेन रेन गो अवे’ म्हणत आहात का?”
पत्रकाराचा हा प्रश्न ऐकल्यानंतर बाबरने देखील तितक्याच गमतीशीह पद्धतीने उत्तर दिले. बाबर म्हणाला की, “नाही सर, आम्ही लहान मुलांना अंगाई गीत ऐकवण्याचे काम करत नाहीये. हे पाहा, हवामान आमच्यासाठी अनुकूल नाहीये. पण एक खेळाडू आणि कर्णधाराच्या रूपात मला सामना झाला पाहिजे, असेच वाटते. जी काही परिस्थिती असेल, आम्ही तयार आहोत आणि स्वतःचे 100 टक्के योगदान देण्यासाठी प्रयत्न करू.”
दरम्यान, भारतीय संघ मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून पराभूत झाला होता. यूएईत खेळल्या गेलेल्या या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने 10 विकेट्स राखून भारताला पराभवाची धूळ चारली होती. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा भारतीय संघाने एकाद्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभव स्वीकारला असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मोहम्मद शमी की शाहीन आफ्रिदी? माजी विश्वविजेता कर्णधार म्हणाला, ‘पाकिस्तानचा गोलंदाज खूपच…..’
वेगाचा नवा बादशाह! वूडने केलीये टी20 इतिहासातील सर्वात भन्नाट गोलंदाज