---Advertisement---

विराटला तंबूत धाडण्यासाठी बांगलादेशने बनवला होता जबरदस्त प्लॅन, पण किंग कोहलीने तोही लावला उलटवून

Shakib Al Hasan
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली बुधवारी (2 नोव्हेंबर) चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने टी-20 विश्वचषक 2022 मधील त्याच्या चौथ्या सामन्यात तिसरे अर्धशतक केले. बांगलादेशविरुद्धचा हा सामना होता, जो भारताने पाच धावांच्या अंतराने जिंकला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या फलंदाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात बांगलादेश लक्ष्यापासून ५ धावा दूर राहिला. सामना गमावल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने विराट कोहलीविषयी महत्वाची माहिती माध्यमांना दिली. 

विराट कोहली (Virat Kohli) बांगलादेशविरुद्ध खेळताना 44 चेंडू खेळला आणि यामध्ये 8 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 64 धावा केल्या. या अप्रतिम खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित देखील केले गेले. उभय संघांतील हा सामना एडिलडच्या ओव्हल मैदानावर खेळला गेला. याठिकाणी विराट कोहलीची आकडेवारी पाहिली तर ती जबरदस्त राहिली आहे. विराटने याठिकाणी आतापर्यंत एकूण 10 सामने खेळले असून यामध्ये 907 धावा केल्या आहेत. या आकडेवारीवरून समजू शकते की, विराटसाठी हे मैदानत खूपच खास राहिली आहे. विराट या मैदानात घातक ठरू शकतो हे बांगलादेशला देकील माहीत होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी विराटसाठी आधीच एक खास रणनीती तयार केली होती.

विराटची विकेट घेण्यासाठी तस्कीन अहमदला गोलंदाजीला पाठवले होते. – शाकिब अल हसन 
सामना संपल्यानंतर शाकिर अल हसन (Shakib Al Hasan) माध्यमांशी बोलत होता. यावेळी विराट कोहलीविषयी प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, “त्यामुळे आम्ही तस्कीन अहमद प्रेस अहमदला गोलंदाजीसाठी पाठवले होते. कारण आम्हाला माहीत होते की, विराट कोहलीला बाद करण्यासाठी हा सर्वात चांगला पर्याय होता. माझ्या मते तस्कीनचे नशीब एवढे चांगले नाव्हते. त्यामुळेच तो विराटला बाद करू शकला नाही. विराट जेव्हा कधी खेळत असतो, तेव्हा सर्व संघ त्याच्याविरोधात रणनीती बनवून येतात. कुणाची रणनीती कामी येते, तर कुणाची अपयशी ठरते. माझ्या मते विराट एक असा खेळाडू आहे, जो एकट्याच्या जोरावर सामना जिंकवून देऊ शकतो.”

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने 6 विकेट्सच्या नुकसानावर 184 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश संघ 6 विकेट्सच्या नुकसानावर 146 धावा करू शकला. सामन्यात पावसाने बाधा आणल्यामुळे बांगलादेशचे लक्ष पांचांनी 185 वरून 151 धावा केले होते. तसेच चार षटकांचा खेळ देखील कमी झाला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आपली टीम इंडियाची जर्सी ‘या’ खेळाडूंना देऊन अर्शदीप अन् चहल बनले हिरो, पाहा फोटो
ऑस्ट्रेलियाला मिळवायचंय टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलचे तिकीट, ‘ही’ आहेत 3 समीकरणे  

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---