भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना देखील चेन्नई मध्येच खेळवला जाणार आहे. मुख्य बाब म्हणजे या सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये येऊन सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (टी.एन.सी.ए) प्रेक्षकांसाठी काही अटी ठेवल्या आहेत, ज्याचे पालन करणे प्रेक्षकांसाठी अनिवार्य असणार आहे.
टी.एन.सी.ए.ने प्रेक्षकांना मास्क घालून स्टेडियम मध्ये प्रवेश करणे अनिवार्य केले आहे. तसेच सामाजिक अंतर ठेवावे लागणार आहे. टी. एन.सी. ए. ने १५,००० तिकिटांची घोषणा केली आहे. तसेच कोव्हिड -१९ चे लक्षण दिसून येणाऱ्या प्रेक्षकांना स्टेडियमच्या आत येण्यास सक्त मनाई असणार आहे.
गैरवर्तवणुक करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
टी.एन.सी.एच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, मैदानात जे कोणी गैरवर्तणूक करतांना आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया मध्ये खेळत असताना, ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टिप्पणी केली होटी. यामुळेच जो कोणी स्टेडियम मध्ये धार्मिक, राजनैतिक टिप्पण्या अथवा चुकीच्या भाषेचा वापर करतांना आढळून येईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय स्टेडियम प्रेक्षकांसाठी खुले
टी.एन.सी.एच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, कोव्हिड -१९ आणि सुरक्षेच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर अनुशासनात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव संपल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय स्टेडियम मध्ये प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये जाऊन लाईव्ह सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना या सामन्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी आहे.
महत्वाच्या बातम्या:
इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यात कोहली किमान एक-दोन शतके नक्की ठोकेल, माजी कर्णधाराची भविष्यवाणी
पुन्हा एकदा फ्लॉप झाल्याने रोहितवर भडकले नेटकरी, संघाबाहेर काढण्याचीही केली मागणी
आयएसएल २०२०-२१ : सहा गोलांच्या थरारात मुंबई सिटी-गोवा बरोबरी