---Advertisement---

आयपीएलनंतर जूनपासून भारतातील ‘या’ राज्यात रंगणार टी२० स्पर्धेचा थरार

---Advertisement---

जगभरात टी -२० क्रिकेटची क्रेझ वाढत चालली आहे. जगातील वेगवेगळ्या भागात अनेक मोठ मोठ्या टी-२० क्रिकेट लीग स्पर्धा खेळल्या जातात.यामध्ये इंडियन प्रीमियर लीग, बीग बॅश लीग आणि पाकिस्तान सुपर लीग अशा अनेक स्पर्धांचा समावेश असतो. यामध्ये जगभरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सहभागी होत असतात. तसेच तामिळनाडूमध्येही तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन गेल्या काही वर्षांपासून केले जाते. या स्पर्धेचा ५ वा हंगाम लवकरच सुरू होणार आहे.

तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (टीएनसीए) बुधवारी (२८ एप्रिल) जाहीर केले आहे की, तामिळनाडू प्रीमियर लीगचे (टीएनपीएल) पाचवा हंगाम ४ जूनपासून खेळवला जाणार आहे. टीएनसीएने म्हटले आहे की, “भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जैव सुरक्षिक वातावरणामध्ये या स्पर्धेच्या आयोजनास मान्यता दिली आहे.”

तसेच टीएनसीएचे सचिव आरएस रामास्वामी यांनी एका प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले की, “टीएनसीए २०२१ स्पर्धेचे आयोजन करण्यास बीसीसीआयने मंजुरी दिली आहे. तामिळनाडू सरकारकडून आवश्यक मंजूरी घेतल्यानंतर ही स्पर्धा तिरुनेलवेली येथे ४ जूनपासून सुरू होईल आणि या स्पर्धेचा अंतिम सामना ४ जुलै रोजी सालेम येथे होईल.”

या स्पर्धेत तामिळनाडू राज्यातील अनेक क्रिकेटपटू सहभागी होत असतात. तसेच या स्पर्धेतून अनेक हिरे बाहेर आले आहेत. ज्यांनी पुढे जाऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यात वरूण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, देवदत्त पडीक्कल, टी नटराजन यांचा समावेश आहे. यासोबतच दिग्गज खेळाडू आर अश्विन, दिनेश कार्तिक आणि मुरली विजय या खेळाडूंमुळे युवा खेळाडूंना मार्गदर्शन मिळत असते.

महत्त्वाच्या बातम्या –

कोलकाताचा अनुभव की दिल्लीचा दम, कोण ठरणार वरचढ? ‘अशी’ असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

“माझ्या आयुष्यातील सर्वात दुर्मिळ क्षण!” धोनीने सोपा झेल सोडताच चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

मागील हंगामातील ‘ही’ गोष्ट सुधारल्याने यंदा कामगिरीत सुधारणा, धोनीने उलगडले कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---