सध्या बांगलादेश मध्ये ढाका प्रीमियर लीग चालू आहे. अनेक बांगलादेशी खेळाडू या लीगमध्ये चांगले प्रदर्शन करीत आहेत. या लीगमध्ये मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब विरुद्ध प्राइम बँक यांच्यातील सामन्यात एक अनोखी व सर्व क्रिकेट दर्शकांना हसवणारी घटना घडली. प्राइम टीमचा खेळाडू तमिम इकबालच्या एका बालिश चूकीमुळे विरोधी संघाला ४ धावा मिळाल्या. त्याचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.
नक्की त्या व्हिडिओमध्ये होते काय?
ढाका प्रीमियर लीगमध्ये मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब विरुद्ध प्राइम बँक हा सामना खेळवण्यात येत होता. सामन्याच्या १४ व्या षटकात शाकिब अल हसनने पिरकीपटू नईम हसनच्या चेंडूवर लॉंग ऑनकडे जबरदस्त शॉट खेळला. पण तिथे आधीपासूनच तमिम इकबाल हा क्षेत्ररक्षण करण्यासाठी उभा होता.
तमिमने चेंडूला आपल्या जवळ येत बघितले असूनही तो खूप आरामात उभा होता. पुढे त्याने तो चेंडू पकडला. पण इथे त्याच्याकडून एक चूक झाली. त्याने चेंडू पकडल्यानंतर तो चेंडू थ्रो करण्यासाठी हात वर उचलला. तेव्हा त्याला कळाले की तो सीमारेक्षाच्या बाहेर उभा आहे.
त्याच्या या निष्काळजीपणामुळे विरोधी संघाला चार धावा मिळाल्या. तमिमने त्याच्या या चुकीसाठी संघ सहकाऱ्यांची क्षमाही मागितली व तो त्या चुकीमुळे निराश झाला होता. त्याचा हा व्हिडिओ सोशियल मीडियावर झपाट्याने व्हायरव होत आहे. चाहते या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत त्याची त्या चुकीवरून खिल्लीसुद्धा उडवत आहेत.
Wtf Tamim 😂 pic.twitter.com/zFHobuCEYr
— Nafiu Kabir (@NafiuKaabir) June 5, 2021
या सामन्यात मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ८ विकेट्स देत १५० धावा केल्या होत्या. प्राइम बँक संघाला या लक्षाचा पाठलाग करता आला नाही. प्राइम बँक क्रिकेट क्लबला हा सामना २७ धावांनी गमवावा लागला. या संघाला १५० चे पाठलाग करताना फक्त १२७ धावा करण्यात यश आले होते.
या स्पर्धेत मोहम्मदान स्पोर्टिंग क्लबच्या संघाने शानदार खेळ दाखविला असून ते गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर आहे. तर यावेळी प्राइम बँक क्रिकेट क्लब गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहेत.
महत्वाच्या बातम्या
संधीची प्रतिक्षा! इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळालेला गोलंदाज म्हणतोय, ‘आता श्रीलंका दौऱ्याची आस’
रहाणेच्या चपळ क्षेत्ररक्षणामागे चक्क मुंबई लोकलचा हात, स्वत: उपकर्णधारानेच केला होता गौप्यस्फोट
कसोटी चॅम्पियनशीप फायनलसाठी विस्डेनने निवडली भारताची प्लेइंग XI, अनुभवी गोलंदाज बाहेर