---Advertisement---

‘या’ भारतीय खेळाडूला ‘स्टीव्ह’ नावाने हाक मारायचे यॉर्कशायरचे खेळाडू; वर्णद्वेष प्रकरणात नवा खुलासा

On: शनिवार, डिसेंबर 5, 2020 9:36 PM
---Advertisement---

अनेक माजी खेळाडूंनी केलेल्या आरोपांनंतर यॉर्कशायर काऊंटीचे वर्णद्वेष प्रकरण आता गंभीर वळण घेत आहे. याच प्रकरणात आता एक नवा खुलासा झाला आहे. यॉर्कशायर काऊंटीच्या माजी कर्मचाऱ्याने भारताच्या चेतेश्वर पुजाराला त्याच्या रंगामुळे इतर संघसहकारी ‘स्टीव्ह’ हाक मारत असत, असे उघड केले आहे.

वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज टिनो बेस्ट आणि पाकिस्तानचा माजी खेळाडू राणा नावेद उल हसन यांनी यॉर्कशायरचा माजी क्रिकेटपटू अझीम रफिक याने केलेल्या वर्णद्वेषाच्या आरोपांना पुष्टी दिली आहे. या आरोपांचे समर्थन करणारे पुरावेही त्यांनी सादर केले आहेत.

आशियाई खेळाडूंना म्हणायचे ‘स्टीव्ह’

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, यॉर्कशायर काऊंटीचे दोन माजी कर्मचारी ताज बट आणि टोनी ब्यूरी यांनी संघातील वर्णद्वेषाच्या प्रकरणांचे पुरावे दिले आहेत. यॉर्कशायर क्रिकेट संस्थेसाठी सामुदायिक विकास अधिकारी म्हणून काम केलेले बट म्हणाले, “यॉर्कशायरमध्ये आशियाई खेळाडूंचा उल्लेख करताना कायमच टॅक्सी चालक आणि रेस्टोरेंटमध्ये काम करणार्‍या लोकांची उदाहरणे दिली जात असत. आशियाई वंशाच्या प्रत्येक व्यक्तीला ‘स्टीव्ह’ अशी हाक मारण्यात येत असे. भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराला देखील ‘स्टीव्ह’ अशीच हाक मारली जाई, कारण ते त्याच्या नावाचा उच्चार करू शकत नसत.”

या सगळ्या प्रकारामुळे बट यांनी ६ महिन्यातच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ब्यूरी मात्र यॉर्कशायर काऊंटीसाठी १९९६ पर्यंत प्रशिक्षक म्हणून, तर १९९६ ते २०११ पर्यंत सांस्कृतिक विविधता अधिकारी म्हणून कार्यरत होते.

वर्णद्वेषाच्या आरोपांबाबत त्यांचा अनुभव विचारला असता ब्यूरी म्हणाले, “युवा खेळाडूंना वर्णद्वेषी टिप्पण्यांमुळे ड्रेसिंग रूममध्ये संघाशी एकरूप होताना अडचणी येत. या सगळ्या टिप्पण्यांचा त्यांच्या खेळावर परिणाम होत असे. मात्र, सामन्यानंतर खराब प्रदर्शनासाठीदेखील त्यांनाच जबाबदार धरले जात असे.”

हे सगळे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या अझीम रफिकने दोन वर्षापूर्वीच यॉर्कशायर काऊंटीला रामराम ठोकला होता. या प्रकरणाने आपल्याला नैराश्य आल्याचे सांगत आत्महत्येचाही विचार डोक्यात येऊन गेला होता, अशी धक्कादायक माहितीही रफिकने दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; ‘हा’ खेळाडू टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता

“त्या खेळाडूला पाहिल्यावर होते राहुल द्रविडची आठवण”

‘…तर तुम्ही कन्कशन सब्स्टिट्यूट घेण्यास पात्र नाही’, भारतीय दिग्गजाची नव्या नियमावर नाराजी

ट्रेंडिंग लेख-

‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?

पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगिरी

अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---