भारतीय संघाने 1 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजचा 200 धावांनी धुव्वा उडवत 3 सामन्यांची मालिका आपल्या नावावर केली. भारताने ही मालिका 2-1ने जिंकली. मालिका विजयासोबतच भारतीय संघाने खास विक्रम रचला. हा भारताचा वेस्ट इंडिजविरुद्धचा सलग 13वा द्विपक्षीय वनडे मालिका विजय ठरला. त्यामुळे भारतीय संघाने कोणत्याही एका संघाविरुद्ध सलग द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा विक्रम आणखी मजबूत केला.
भारताचा विश्वविक्रम
या विश्वविक्रमात भारतीय संघ पहिल्या स्थानी आहे. या विक्रमात भारताने पाकिस्तानपासूनचे अंतर वाढवले आहे. पाकिस्तान संघाने 1996पासून आतापर्यंत झिम्बाब्वे संघाविरुद्ध 11 वनडे मालिका जिंकल्या आहेत. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या ज्या 13 वनडे मालिका जिंकल्या आहेत, त्यात भारत विंडीजला मायदेशात 7 वेळा, तर विंडीजला त्यांच्याच देशात 6 वेळा पराभूत करण्यात यशस्वी ठरला आहे.
𝗪𝗶𝗻𝗻𝗲𝗿𝘀 𝗔𝗿𝗲 𝗚𝗿𝗶𝗻𝗻𝗲𝗿𝘀! ☺️
Congratulations #TeamIndia on winning the ODI series 🙌 🙌#WIvIND pic.twitter.com/NHRD8k5AGe
— BCCI (@BCCI) August 1, 2023
भारतीय संघाने 2007पासून या कारनाम्याची सुरुवात केली होती, जो अजूनही सुरूच आहे. दुसरीकडे, पाकिस्तान संघानेही वेस्ट इंडिजविरुद्ध मागील 10 द्विपक्षीय वनडे मालिका जिंकल्या आहेत. तसेच, भारताने श्रीलंकेविरुद्धही मागील 10 वनडे मालिका जिंकल्या आहेत. याची सुरुवात 2007पासून झाली होती, जी आजही सुरू आहे.
भारतीय संघाच्या युवा खेळाडूंचे दमदार प्रदर्शन
भारतीय संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत युवा खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली होती. यावेळी ईशान किशन सलामीवीराच्या रूपात उतरला होता. त्याने या मालिकेत सलग 3 अर्धशतके ठोकली. तसेच, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांनीही कमालीची गोलंदाजी केली. याव्यतिरिक्त तिसऱ्या वनडेत मुकेश कुमार यानेही आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.
टी20 मालिकेत आमने-सामने
आता वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. हा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडिअम येथे पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) करणार आहे. तसेच, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या मालिकेत खेळणार नाहीयेत. (team india creates unique record after winning odi series against west indies lets know)
महत्त्वाच्या बातम्या-
कधी, कुठे आणि कसा पाहायचा भारत-वेस्ट इंडिज संघातील पहिला टी20 सामना? एका क्लिकवर घ्या जाणून
इंग्लंड-ऑस्ट्रेलियाने केली घोडचूक! डब्ल्यूटीसीच्या पहिल्याच मालिकेत बसला मोठा फटका