---Advertisement---

शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात ‘या’ खेळाडूची निवड

On: सोमवार, फेब्रुवारी 22, 2021 7:34 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले असून आता तिसरा आणि चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर पार पडणार आहे. या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे.

उमेश यादव घेणार शार्दुल ठाकूरची जागा –

उमेश यादव ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. पण आता तो दुखापतीतून सावरला आहे. त्याची २१ फेब्रुवारीला मोटेरा स्टेडियमवर तंदुरुस्ती चाचणी घेण्यात आली होती. तो तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाला असून आता त्याचा भारतीय संघात अहमदाबाद कसोटींसाठी समावेश करण्यात आला आहे. तो शार्दुल ठाकूरची जागा घेईल. शार्दुलला विजय हजारे ट्रॉफीसाठी मुक्त करण्यात आले आहे.

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर तिसरा आणि चौथा कसोटी सामना – 

अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम असणाऱ्या मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघात तिसरा आणि चौथा कसोटी सामना होणार आहे. तिसरा सामना दिवस- रात्र कसोटी सामना असून हा सामना २४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तर चौथा सामना ४ मार्चपासून सुरु होणार आहे.

या स्टेडियमवर होणारा दिवस-रात्र कसोटी सामना हा भारतातील दुसराच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा हा एकूण तिसरा तर इंग्लंडचा हा एकूण चौथा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.

तसेच हा दिवस-रात्र कसोटी सामना पुर्नबांधणी करण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल.

तिसऱ्या कसोटीला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरुवात होईल. तर चौथा सामना सकाळी ९.३० वाजता सुरु होईल.

असा आहे अहमदाबाद येथे होणाऱ्या दोन कसोटींसाठी भारतीय संघ – 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

नेट गोलंदाज – अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णप्पा गॉथम आणि सौरभ कुमार

राखीव खेळाडू – केएस भरत आणि राहुल चाहर

महत्त्वाच्या बातम्या –

अफाट प्रतिभेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्याय न देऊ शकलेले नरेंद्र हिरवानी

टीम इंडियातून बाहेर केलेल्या तुफानी ‘या’ खेळाडूने शतकासह दिले निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर

इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी ‘या’ खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा सोडावी लागणार अर्धवट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---