भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. बुधवारी (१६ डिसेंबर) भारतीय संघातील खेळाडू जोहान्सबर्ग येथे पोहचले. त्यानंतर आता खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंच्या सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मस्ती, वाद अन् बरच काही
बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की खेळाडू पळण्याचा सराव करत आहेत, त्यानंतर त्यांनी व्यायम केला आहे. तसेच काहीवेळाने सर्व खेळाडू मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह फुटबॉल खेळताना दिसत आहेत.
यावेळी भारतीय खेळाडू एकमेंकांबरोबर स्पर्धा करताना, मस्ती करताना आणि गमतीशीर वक्तव्य करतानाही दिसत आहेत. द्रविड देखीव सर्व खेळाडूंबरोबर मस्ती करताना दिसतोय. त्याचबरोबर भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)आणि राहुल द्रविड (Rahul Dravid)हाय-फाय करतानाही दिसून येत आहेत. इतकंच नाही, तर एका क्षणी दिग्गज फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) चिडलेलाही दिसून येत आहे.
सध्या भारतीय संघ (Team India) कडक बायोबबलमध्ये आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील वातावरणात मिसळण्यासाठी काही काळ लागू शकतो, त्यामुळे भारतीय खेळाडूंनी सोप्यापद्धतीने सरावास सुरुवात केली असल्याचे स्ट्रेंथ आणि कंडिशनींग प्रशिक्षक सोहम देसाई यांनी सांगितले.
How did #TeamIndia recharge their batteries ahead of their first training session in Jo'Burg? 🤔
On your marks, get set & Footvolley! ☺️😎👏👌#SAvIND pic.twitter.com/dIyn8y1wtz
— BCCI (@BCCI) December 18, 2021
भारतीय संघाच्या राहण्याची व्यवस्था ६० हेक्टरमध्ये परसलेल्या आलिशान रिसॉर्टमध्ये
दक्षिण आफ्रिकेतील आयरीन कंट्री लॉज (Irene country lodge) याठिकाणी भारतीय संघाच्या राहण्याची व्यवस्था केली गेली आहे. विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून संघ सेंचुरियनला जाणार आहे आणि त्याठिकाणी संघाला पहिला कसोटी सामना खेळायचा आहे. भारतीय संघाची व्यवस्था करण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून या रिसॉर्टला बंद ठेवण्यात आले होते.
भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा
भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील (India Tour of South Africa) सामन्यांना २६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेने सुरुवात होणार आहे. पहिलात सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असेल. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर या दौऱ्यात भारतीय संघाला ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ- विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाल, केएल राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
राखीव- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दिपक चहर, अर्झान नागवासवल्ला
असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मालिकेचे वेळापत्रक
कसोटी मालिका :
पहिला कसोटी सामना: २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन)
दुसरा कसोटी सामना : ३-७ जानेवारी,२०२२ (जोहान्सबर्ग)
तिसरा कसोटी सामना: ११-१५ जानेवारी,२०२२ (केपटाऊन)
वनडे मालिका :
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केपटाऊन)
महत्त्वाच्या बातम्या –
हरभजनच्या गोलंदाजीवर अमिताभ बच्चन यांची फटकेबाजी अन् इरफानची कॉमेंट्री, व्हिडिओ व्हायरल
दुष्काळात तेरावा महिना! इंग्लंडने कसोटी चॅम्पियनशीपमधील गमावले तब्बल ८ गुण, वाचा सविस्तर
थरारक! ऍडलेड कसोटीदरम्यान वीजांचा कडकडाट, पंचासह खेळाडूही घाबरले