इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून चार कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता या मालिकेतील शेवटचे दोन सामने अहमदाबादला होणार आहेत. या दोन सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताचा १७ जणांचा संघ जाहीर केला आहे.
या संघाचे नेतृत्व विराट कोहलीच करणार असून, अजिंक्य रहाणे उपकर्णधार असणार आहे. याशिवाय रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारास शुबमन गिल हे फलंदाज संघात कायम असून गोलंदाजांमध्ये आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज कायम आहेत.
TEAM – Virat Kohli (Capt), Rohit Sharma, Mayank Agarwal, Shubman Gill, Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane (vc), KL Rahul, Hardik Pandya, Rishabh Pant (wk), Wriddhiman Saha (wk), R Ashwin, Kuldeep Yadav, Axar Patel, Washington Sundar, Ishant Sharma, Jasprit Bumrah, Md. Siraj.
— BCCI (@BCCI) February 17, 2021
उमेश यादव घेणार शार्दुल ठाकूरची जागा –
उमेश यादव ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. पण आता तो दुखापतीतून सावरला आहे. तरी त्याची तंदुरुस्ती चाचणी झाल्यानंतर तो देखील भारतीय संघात अहमदाबाद कसोटींसाठी सामील होईल. तो शार्दुल ठाकूरची जागा घेईल. शार्दुलला विजय हजारे ट्रॉफीसाठी मुक्त करण्यात आले आहे.
पाच नेट गोलंदाजांचा समावेश –
बीसीसीआयच्या निवड समीतीने ५ नेट गोलंदाज आणि २ राखील खेळाडूंचीही निवड केली आहे. नेट गोलंदाजांमध्ये अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णप्पा गॉथम आणि सौरभ कुमार यांचा समावेश आहे. तर राखीव खेळाडूंमध्ये केएस भरत आणि राहुल चाहरचा समावेश आहे.
याशिवाय अभिमन्यू इश्वरन, शाहबाज नदीम आणि प्रियांक पांचाल यांना २० फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी मुक्त करण्यात आले आहे.
The Committee also picked five net bowlers and two players as standbys.
Net Bowlers: Ankit Rajpoot, Avesh Khan, Sandeep Warrier, Krishnappa Gowtham, Saurabh Kumar
Standby players: KS Bharat, Rahul Chahar.#INDvENG
— BCCI (@BCCI) February 17, 2021
जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर तिसरा आणि चौथा कसोटी सामना
अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम असणाऱ्या मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघात तिसरा आणि चौथा कसोटी सामना होणार आहे. तिसरा सामना दिवस- रात्र कसोटी सामना असून हा सामना २४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तर चौथा सामना ४ मार्चपासून सुरु होणार आहे.
या स्टेडियमवर होणारा दिवस-रात्र कसोटी सामना हा भारतातील दुसराच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा हा एकूण तिसरा तर इंग्लंडचा हा एकूण चौथा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.
तसेच हा दिवस-रात्र कसोटी सामना पुर्नबांधणी करण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल.
तिसऱ्या कसोटीला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरुवात होईल. तर चौथा सामना सकाळी ९.३० वाजता सुरु होईल.
असा आहे अहमदाबाद येथे होणाऱ्या दोन कसोटींसाठी भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव (तंदुरुस्तीवर अवलंबून).
नेट गोलंदाज – अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णप्पा गॉथम आणि सौरभ कुमार
राखीव खेळाडू – केएस भरत आणि राहुल चाहर
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कारणामुळे जो रूटने मागितली मोईन अलीची माफी
जगातील टाॅप ५ श्रीमंत क्रिकेट लीग, जिथे क्रिकेटर्स होतात करोडपती
कसोटी क्रमवारी : रोहित, पंत, अश्विनची गरुडझेप, तर जो रुट, स्टुअर्ट ब्रॉडची घसरण