गुरुवारी (दि. 14 सप्टेंबर) पाकिस्तानच्या पदरी निराशा पडली. आधी श्रीलंकेविरुद्ध पराभूत होत त्यांना आशिया चषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. नंतर याच पराभवामुळे आयसीसी वनडे रँकिंगच्या अव्वल 2 स्थानांमधूनही त्यांचा पत्ता कट झाला. पाकिस्तानच्या या पराभवामुळे भारतीय संघाला जबरदस्त फायदा झाला आहे.
भारतीय संघ (Team India) 116 रेटिंगसह आता आयसीसी वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Rankings) अव्वल- 2मध्ये पोहोचला आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या डोक्यावर वनडे रँकिंगचा ताज आहे. पाकिस्तान आशिया चषकात अव्वल क्रमांकाचा संघ म्हणून सामील झाला होता. मात्र, स्पर्धेतील खराब प्रदर्शनानंतर त्यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
ऑस्ट्रेलिया संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात 5 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यात पहिले दोन सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने 2-1ने आघाडी घेतली आहे. या दोन सामन्यांमुळे ऑस्ट्रेलिया सध्या 118 रेटिंगसह अव्वलस्थानी आहे. दुसरीकडे, भारतीय संघ आशिया चषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली शानदार प्रदर्शन करत आहे. संघाने आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच, एक सामना पावसामुळे रद्द झाला. सध्या भारतीय संघ 116 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
भारताकडे अव्वल बनण्याची संधी
विशेष म्हणजे, आशिया चषक संपेपर्यंत भारताकडे अव्वल क्रमांकाचा संघ बनण्याची शानदार संधी आहे. भारताचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध 15 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सुपर- 4 फेरीतील अखेरचा सामना आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया संघही आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथा वनडे सामना खेळणार आहे. भारताने विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला, तर भारतीय संघ आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहोचेल.
Indian Team ranking in all formats:
Test – 1
T20I – 1
ODI – 2The best team in the world…..!!!!! pic.twitter.com/I2gt9YMPX6
— Johns. (@CricCrazyJohns) September 15, 2023
कसोटी आणि टी20त अव्वलस्थानी
खास बाब अशी की, भारतीय संघ कसोटी आणि टी20 रँकिंगमध्ये अव्वलस्थानी आहे. त्यामुळे वनडेतही भारत अव्वलस्थान मिळवून आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करेल. (team india gets huge advantage in icc odi rankings due to pakistan defeat vs sri lanka asia cup 2023)
हेही वाचा-
पाकिस्तानच्या नांग्या ठेचताच श्रीलंकन कॅप्टनचे लक्षवेधी भाष्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध केलेल्या चुका…’
Finalचं तिकीट हुकताच खचून गेला बाबर, आपल्याच खेळाडूंवर काढला सगळा राग; म्हणाला, ‘म्हणून आम्ही हारलो…’