ब्रिस्बेनच्या कसोटीत भारतीय संघाने अविश्वसनीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारली आणि चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळविला. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर गेली ३२ वर्षे ऑस्ट्रेलियन संघ पराभूत झाला नव्हता, त्यामुळे यावेळीही नवख्या खेळाडूंसह उतरणाऱ्या भारतीय संघाचा पाडाव होईल, असाच अनेकांचा होरा होता. मात्र या सगळ्या गृहितकांना आणि इतिहासाला खोटे पाडत भारताने विजय मिळवला.
यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. मात्र बोलताना त्यांची जीभ घसरली. त्यांच्या मजेशीर वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीची चर्चा केली. २०१८ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत कसोटी मालिका जिंकली होती. तरीही क्रिकेट रसिक आणि तज्ञ भारताच्या विजयावर फारसे आनंदी नव्हते. परंतु यावेळची परिस्थिती उलट दिसल्याचे शास्त्रींनी सांगितले आहे.
ते म्हणाले की, “जेव्हा आम्ही मागच्या वेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलो होतो आणि जिंकलो होतो. त्यावेळी लोक म्हणत होते की, स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर सारखे खेळाडू संघात नव्हते. पण यावेळी आमच्या संघात कुठे जास्त अनुभवी खेळाडू उपलब्ध होते. तरीही आम्ही ऑस्ट्रेलियाची बॅन्ड वाजवून आलो आहोत. आता कोणीही तसे बोलत नाही.”
A special Test series triumph in Australia
A new chapter in life
Return of international cricket in IndiaDO NOT MISS: #TeamIndia skipper @imVkohli and Head Coach @RaviShastriOfc get candid. 😎👌
Watch the full interview 🎥 https://t.co/9gffUQG2I2 @Paytm #INDvENG pic.twitter.com/ISg5TzMPXn
— BCCI (@BCCI) February 5, 2021
https://twitter.com/ashishcricket24/status/1357584726232420352?s=20
शास्त्रींबरोबर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही मुलाखतीत उपस्थित होता. यावेळी बोलताना कोहलीने ऑस्ट्रेलियातील विजय खूप विशेष असल्याचे सांगितले. सोबतच युवा क्रिकेटपटूंच्या प्रदर्शनाचीही त्याने प्रसंशा केली.
ऑस्ट्रेलिया दौरा आटोपून आता भारत इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ५ फेब्रुवारीपासून या मालिकेची सुरुवात झाली आहे. पाहुण्या इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर ३ बाद २६३ धावा केल्या आहेत. कर्णधार जो रूट आणि बेन स्टोक्स फलंदाजी करत आहेत. ९ फेब्रुवारी रोजी हा सामना संपेल.
महत्त्वाच्या बातम्या-
गुगल गंडल! ६० वर्षीय रवी शास्त्रीचं गुगलवरील वय चक्क दुप्पट, खोट वाटतंय तर सर्च करुन पाहा
भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकाबाबत रवी शास्त्री यांनी केले भाष्य; ‘या’ गोष्टीची केली मागणी