आशिया चषक 2023 स्पर्धा 30 ऑगस्टपासून श्रीलंका व पाकिस्तानात सुरुव होईल. हायब्रीड मॉडेलनुसार होणाऱ्या या स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानात तर इतर सामने श्रीलंकेत होणार आहेत. स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने बंगळुरूच्या अलूर येथे विशेष शिबिरात भाग घेतला. पहिल्या दिवशीच्या या सराव शिबिरात संघात निवड झालेल्या सर्व खेळाडूंनी घाम गाळला. त्यासोबतच भारतीय संघासह तब्बल 15 नेट बॉलर्स दिसून आले.
आशिया चषकासाठी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे हे शिबिर आयोजित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलेला. पहिल्या दिवसाच्या सराव सत्रात भारतीय खेळाडूंनी तब्बल सहा तास सराव केला. या सराव शिबीरात एनसीएमधील 15 गोलंदाज आमंत्रित केले गेले आहेत. यामध्ये उमरान मलिक, यश दयाल, कुलदीप सेन, साई किशोर, मानव सुतार, हर्षित राणा, राहुल चहर, शम्स मुलानी, कार्तिक त्यागी व इतरांचा समावेश आहे.
हेच गोलंदाज आशिया चषकानंतरही भारतीय संघासोबत दिसून येण्याची शक्यता आहे. विश्वचषकाच्या दृष्टीने बीसीसीआय या खेळाडूंना भारतीय संघाच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये पुन्हा आमंत्रित करू शकते. बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सध्या अनेक युवा क्रिकेटपटू तयारी करत आहेत.
आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
राखीव खेळाडू – संजू सॅमसन
(Team India Included 15 Net Bowlers For Asia Cup Training Camp)
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषक 2023मध्ये संधी न मिळालेल्या भारतीय दिग्गजचा मोठा निर्णय, धरली इंग्लंडची वाट
आशिया कपवर कोरोनाचे सावट! स्पर्धा सुरू होण्याआधीच घडलं असं, लगेच वाचा