भारत श्रीलंका दरम्यान झालेल्या टी-20 मालिकेत भारताला 1-2 अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला. भारताने एकदिवसीय मालिकेत वर्चस्व राखले, परंतु टी-20 मालिकेत भारताला लय राखता आली नाही. श्रीलंकेने जबरदस्त प्रदर्शन करत मालिका खिशात घातली. दरम्यान. टी-20 मालिकेत कुठे ना कुठे भारताला तीन महत्त्वाच्या खेळाडूंची उणीव जाणवली. जर हे खेळाडू संघात असते तर कदाचित टी-20 मालिकेचा निकाल वेगळा लागला असता.
या टी-20 मालिकेदरम्यान भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात असलेल्या खेळाडूंना क्वारंटाईन व्हावे लागले होते. त्याच कारणामुळे या टी-20 मालिकेतील अखेरच्या 2 सामन्यांत भारतीय संघातील अनेक प्रमुख खेळाडू खेळले नाहीत.
सुर्यकुमार यादव
श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या सूर्यकुमारला टी-20 मालिकेत फक्त पहिला सामना खेळता आला. त्यातही त्याने अर्धशतक झळकावले होते आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. एकदिवसीय मालिकेत त्याने 62 च्या सरासरीने 124 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याची उणीव उर्वरित दोन्ही टी-20 सामन्यात दिसून आली.
दीपक चाहर
आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने सर्वांना अचंबित करून सोडणारा वेगवान गोलंदाज दीपक चाहरची उणीव भारतीय संघाला अखेरच्या दोन टी-20 सामन्यात भासली. त्याने टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दोन विकेट घेत भुवनेश्वर कुमारला सुरेख साथ दिली होती. तसेच एकदिवसीय मालिकेत देखील त्याने चांगली कामगिरी केली होती. मात्र, उर्वरित दोन सामन्यासाठी त्याला आयसोलेशनमध्ये राहावे लागले होते. त्याचा परिणाम भारतीय गोलंदाजीवर पाहायला मिळाला.
ईशान किशन
या दौऱ्यात एकदिवसीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या ईशान किशनने आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात अर्धशतकीय खेळी साकारली. परंतुस दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी झाल्याने त्यास तिसऱ्या सामन्यात खेळविण्यात आले नाही. असेच काहीसे टी-20 मालिकेतही झाले. टी-20 मालिकेत पहिला सामना खेळल्यानंतर त्याला इतर काही खेळाडूंप्रमाणे आयसोलेशनमध्ये रहावे लागले, परिणामी भारतीय फलंदाजीत त्याची उणिव जाणवली.
महत्त्वाच्या बातम्या
– तिरंदाजीत पराभूत झाल्यानंतर अतनू दासने मागितली देशाची माफी; म्हणाला, ‘सॉरी इंडिया…’
– मुथय्या मुरलीधरन म्हणतो, ‘कुलदीपला टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियात स्थान मिळायला हवे, कारण तो…’
– ‘स्टोक्स भारताविरुद्ध खेळायला घाबरतो का?’ कसोटी मालिकेतून माघार घेतल्यानंतर चाहत्याकडून ट्रोल