भारताने 2025 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. त्यानंतर वनडे संघाच्या कर्णधारपदी शुबमन गिलची नियुक्ती केली. त्यानंतर संघाच्या कामगिरीत बरेच बदल झाले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत चार मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी केवळ एकाच मालिकेत भारताने विजय मिळवला.
भारताने गिलच्या कर्णधारपदाखाली मिळवलेला मालिका विजय अफगाणिस्तानविरुद्ध असून तो मायदेशात आला आहे. यावरून गिलचे नेतृत्व अपेक्षेपेक्षा खूपच कमी प्रभावी ठरले आहे. संघाची अशीच कामगिरी सुरू राहिली तर अडचणी आणखी वाढतील. त्यातच 2027 विश्वचषकही जवळ आला आहे. त्यामुळे संघाच्या कामगिरीमध्ये सुधारणा आवश्यक आहे. आता भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे.
गिलचे नेतृत्व
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकल्यावरही त्याला कर्णधारपदावरून हटवले आणि गिलला नेतृत्वाची सूत्रे सोपवली गेली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथम ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. तेथे तीन सामन्यांमध्ये भारताला केवळ एकच सामना जिंकता आला. त्यानंतर न्यूझीलंडने भारताचा दौरा केली आणि ही मालिका 1-2 अशी गमावली. आश्चर्याची बाब म्हणजे 1988 नंतर पहिल्यांदाच न्यूझीलंडने भारतात वनडे मालिका जिंकण्याची कामगिरी केली.
गिलच्या नेतृत्वाखालील एकमेव मालिका विजय
भारताने गिलच्या नेतृत्वाखाली केवळ एकच वनडे मालिका जिंकली आहे. घरच्या मैदानावर भारताने अफगाणिस्तानला तिन्ही सामन्यात पराभूत करत ही कामगिरी केली. त्यामुळे संघ लयीत आल्याचे वाटत असताना इंग्लंडमध्ये मात्र निराशा झाली.
पुढील वनडे मालिका
भारताची पुढील वनडे मालिका सप्टेंबर महिन्यात आहे. ही मालिका वेस्ट इंडिज विरुद्ध घरच्या मैदानावर खेळली जाणार आहे. यामध्येही तीन सामने खेळले जाणार असून आयसीसी वनडे विश्वचषक 2027 च्या पूर्वतयारीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे भारत यामध्ये कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेचे वेळापत्रक
या मालिकेतील पहिला सामना 27 सप्टेंबरला तिरुअनंतपुरम, दुसरा सामना 30 सप्टेंबरला गुवाहाटी आणि तिसरा सामना 3 ऑक्टोबरमध्ये मुल्लाणपूरमध्ये खेळला जाणार आहे. (Team India ODI performance under Shubman Gill captaincy)





