भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकरांचे बुधवारी (15 आॅगस्ट) वयाच्या 77 व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही काळापासून अजित वाडेकर आजारी होते.
त्यामुळे सध्या इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाने नॉटिंगहॅमवरुन अजित वाडेकरांना दोन मिनिटांची शांतता ठेऊन श्रद्धांजली वाहिली आहे. याचा फोटो बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
#TeamIndia members observe a two minute silence to condole the sad demise of former India Captain Ajit Wadekar. pic.twitter.com/Ao69bXV10T
— BCCI (@BCCI) August 16, 2018
याबरोबर बीसीसीआयच्या प्रसिद्धी पत्रकात वाडेकरांना इतिहास घडवणारा माणुस असे म्हटले आहे.
तसेच बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी म्हणाले, “वाडेकरांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी पहिल्यांदा फलंदाज म्हणून आणि नंतर कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले होते.
तसेच त्यानंतर त्यांनी प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि निवड समितीचे अध्यक्ष म्हणून योगदान दिले आहे. खेळताना त्यांना मिळालेल्या अनुभवाचा त्यांनी प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून चांगला उपयोग करत चांगले यश मिळवले.”
वाडेकर हे भारताचे पहिले वनडे कर्णधार होते. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1971 मध्ये परदेशात पहिल्यांदा सलग दोन कसोटी मालिकाही जिंकल्या.
वाडेकरांनी भारताकडून 37 कसोटी सामने खेळले असुन यात त्यांनी 1 शतक आणि 14 अर्धशतकांसह 2113 धावा केल्या आहेत. याबरोबरच ते 2 वनडे सामने खेळले असुन यात त्यांनी एक अर्धशतक केले आहे.
वाडेकरांनी मुंबईकडून खेळताना 237 प्रथम श्रेणी सामन्यात 47.03 च्या सरासरीने 15380 धावा केल्या आहेत. यात त्यांनी 36 शतके आणि 84 अर्धशतके केली आहेत.
वाडेकरांच्या निधनानंतर अनेक आजी-माजी खेळाडूंनी सोशल मिडियावरुन त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–नाहीतर सचिन कधीही सलामीवीर झाला नसता…
–अजित वाडेकरांबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी
–वाढदिवस विशेष- कसोटी क्रिकेट गाजवलेल्या चंद्रपाॅलबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी