भारताने शुक्रवारी (दि. 14 जुलै) आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 साठी संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, शिवम दुबे यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. महत्त्वाची बाब अशी की, या संघाचे कर्णधारपद ऋतुराजकडे सोपवण्यात आले आहे. तसेच, आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्स संघातील एक-दोन नाही, तर 3 खेळाडूंनाही या संघात जागा मिळाली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये (Asian Games 2023) भारतीय संघात सामील झालेल्या पंजाबच्या 3 खेळाडूंमध्ये अर्शदीप सिंग (Arshdeep Singh), जितेश शर्मा आणि प्रभसिमरन सिंग यांना संधी देण्यात आली आहे. या तिन्ही खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. यासोबतच या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगले प्रदर्शन केले आहे. अर्शदीप भारतीय संघाकडून खेळला आहे. मात्र, जितेश शर्मा (Jitesh Sharma) आणि प्रभसिमरन सिंग (Prabhsimran Singh) यांना पहिल्यांदा संधी मिळाली आहे.
पंजाब किंग्स संघाने भारतीय संघात निवड झाल्यानंतर प्रभसिमरन, जितेश आणि अर्शदीप यांचे ट्वीटद्वारे अभिनंदन केले. पंजाबने ट्वीटमध्ये तिन्ही खेळाडूंचा फोटो लावला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये क्रिकेट टी20 प्रकारात खेळले जाईल. त्यामुळे आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
From entertaining us in 🔴 to now being a part of the #MenInBlue 🔵
Congratulations @prabhsimran01, @jiteshsharma_, and @arshdeepsinghh on being selected for the #AsianGames! 🤩#SaddaPunjab pic.twitter.com/6CYU03nRYX
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) July 15, 2023
खेळाडूंची कामगिरी
अर्शदीपबाबत बोलायचं झालं, तर त्याने भारतासाठी 26 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 41 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान 37 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. दुसरीकडे, जितेशबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 26 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 543 धावा केल्या आहेत. जितेशची सर्वोत्तम धावसंख्या 49 राहिली आहे. मात्र, त्याच्या एकूण टी20 क्रिकेट कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 90 सामन्यात 2096 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि 9 अर्धशतकेही झळकावली आहेत. याव्यतिरिक्त त्यान अ दर्जाच्या सामन्यात 1350 धावाही केल्या आहेत.
याव्यतिरिक्त प्रभसिमरन सिंग याच्याबद्दल बोलायचं झालं, तर तो यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याने 20 आयपीएल सामन्यात 422 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. जर प्रभसिमरनच्या देशांतर्गत टी20 कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 55 सामन्यात 1514 धावा केल्या आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुष क्रिकेट सामने 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहेत. (team india selected punjab kings this 3 cricketer for asian games 2023)
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023साठी भारतीय संघ-
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग.
महत्वाच्या बातम्या-
दिवस बदलले! टीम इंडियाचा स्टार जयसवालने ठाण्यात घेतलं नवीन घर, आधी राहायचा भाड्याच्या घरात
भारताने सामना तर जिंकलाच, पण विराटचा डान्सने लुटली सगळी वाहवा; ‘किंग’ कोहलीचे ठुमके वेधतायत लक्ष