---Advertisement---

आता लक्ष्य टेस्ट चॅम्पियनशीप! भारतीय संघ क्वारंटाईनदरम्यान देखील घेतोय प्रचंड मेहनत, व्हिडिओ व्हायरल

On: मंगळवार, जून 1, 2021 10:22 AM
---Advertisement---

भारतीय कसोटी संघासाठी पुढील काही महिने फार महत्त्वाचे असणार आहेत. कारण अगामी काळात भारतीय कसोटी संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच इंग्लंड विरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरु आहे.

या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ २ किंवा ३ जून रोजी रवाना होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी दौऱ्यावर जाणारे भारतीय खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ सदस्य मुंबईमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. या क्वारंटाईन कालावधीदरम्यान भारतीय खेळाडूंना जीममध्ये सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे. यादरम्यान जीममधील सर्व सुविधा वेळोवेळी सानिटाईज केल्या जात आहेत.

बीसीसीआयने नुकताच जीममध्ये घाम गाळत असलेल्या भारतीय खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह असे काही खेळाडू व्यायाम करताना दिसत आहे. यादरम्यान ते एकमेकांबरोबर चर्चाही करताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचे स्ट्रेंथ अँड कंडीशनिंग प्रशिक्षक सोहम देसाईने म्हटले आहे की ‘इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला ३ आठवड्याची विश्रांती मिळणे फायदेशीर ठरले. यामुळे खेळाडूंना ताजेतवाने होण्याची संधी मिळाली. ज्याचा परिणाम आपल्याला इंग्लंड दौऱ्यावर दिसून येऊ शकतो.’

https://twitter.com/BCCI/status/1399337662339633153

भारताचे महिला आणि पुरुष दोन्ही संघ एकत्रच इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे पुरुष क्रिकेटपटूंबरोबरच महिला क्रिकेटपटूही मुंबईत क्वारंटाईन आहेत.

असा असेल भारतीय संघाचा इंग्लंड दौरा
भारतीय पुरुष संघाला न्यूझीलंड विरुद्ध १८ ते २२ जूनदरम्यान न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तर महिला संघाला इंग्लंड विरुद्ध एक कसोटी सामना, ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.

असे आहे संपूर्ण वेळापत्रक

पुरुष संघ – 
कसोटी अजिंक्यपद
१८ ते २२ जून – कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड), साऊथँम्पटन

कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर

महिला संघ – 
१६ – १९ जून – एकमेव कसोटी सामना, ब्रिस्टोल

२७ जून – पहिला वनडे सामना, ब्रिस्टोल
३० जून – दुसरा वनडे सामना, टॉन्टन
३ जुलै – तिसरा वनडे सामना, वॉरेस्टर

९ जुलै – पहिला टी२० सामना, नॉर्थॅम्प्टन
११ जुलै – दुसरा टी२० सामना, होव
१४ जुलै – तिसरा टी२० सामना, चेम्सफोर्ड

महत्त्वाच्या बातम्या –

WTC Final: ‘या’ कारणामुळे न्यूझीलंड भारतीय संघाला ठरु शकतो वरचढ, माजी भारतीय कर्णधाराने मांडले मत

‘हा’ ट्विटरकर्ता गेल्या १० वर्षांपासून विराट कोहलीला देतोय त्रास; काय आहे नेमकं कारण, घ्या जाणून

भारतीय संघाला बसणार फटका? ‘या’ दिग्गज गोलंदाजाला कोरोनाची लक्षणे; रिपोर्ट्सची प्रतिक्षा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---