चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ समोरासमोर आले होते. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला 60 धावांनी हरवले. तसेच दुसरा सामना भारत विरुद्ध बांगलादेश दोन्ही संघात खेळला गेला. भारताने या सामन्यात बांगलादेशचा 6 विकेट्सनी पराभव केला. याबरोबरच आज चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा सामना साऊथ आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघामध्ये होणार आहे.
हा ग्रुप बी संघाचा पहिला सामना असेल.आतापर्यंत दोन सामने ग्रुप ए च्या संघांमध्ये झाले आहेत. साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्याशिवाय ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ आहेत. तसेच ए ग्रुपमध्ये भारत,पाकिस्तान,बांगलादेश आणि न्यूझीलंड संघ आहेत.
पॉईंट्स टेबलमध्ये कोणता संघ कोणत्या स्थानी आहे ते जाणून घेऊया. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध सामना खेळून विजय मिळवलेला आहे. या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये किती बदल झाला आहे?
भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध शानदार विजय मिळवलेला असूनही भारतीय संघ पॉइंट्स टेबल मध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तसेच टॉम लेथमच्या नेतृत्वातील न्युझीलँड संघ पॉइंट्स टेबल वर टॉपच्या स्थानी आहे. भारत आणि न्यूझीलंड संघाचे बरोबर 2-2 पॉईंट्स आहेत. पण किवी संघाचा नेट रन रेट भारतीय संघाच्या नेट रन रेट पेक्षा अधिक आहे. न्यूझीलंडचा नेट रन रेट +1.200 आहे तर, भारतचा नेट रन रेट + 0.408 आहे.
तसेच ह्याच ग्रुपमधील बांगलादेश संघ पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. तसेच मोहम्मद रिजवानच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ पॉइंट्स टेबल मध्ये चौथ्या नंबर वर आहे. आज ग्रुप बी मधील दोन संघ समोरासमोर असतील. शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात सामना होईल. स्पर्धेत एकूण आठ संघ खेळत आहेत. या आठ संघांना दोन ग्रुप मध्ये समाविष्ट केले आहे. भारत,पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश ए ग्रुपमध्ये आहेत.तसेच साऊथ आफ्रिका अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ ग्रुप बी मध्ये आहेत.
हेही वाचा
शिखर धवनला मिळाली नवी जीवनसाथी? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
विराट कोहली इतिहास रचणार? मोहम्मद अझरुद्दीनचा 25 वर्षे जुना विक्रम मोडण्याची संधी
गिलची खेळी सोनेरी ठरली, टीम इंडियाने आयसीसी वनडे स्पर्धेत नवा मैलाचा टप्पा गाठला!






