टी20 विश्वचषकातील साखळी सामने आता जवळपास संपले आहेत. या विश्वचषकात रोज नवं-नवे रेकॉर्ड बनत आहेत, तर अनेक रेकॉर्ड मोडल्याही जात आहेत.
स्पर्धेतील 32 वा सामना 14 जून रोजी न्यूझीलंड आणि युगांडा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील किवी संघानं 9 गडी राखून मोठा विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना युगांडाचा संघ 18.4 षटकात अवघ्या 40 धावांवर गडगडला. 41 धावांचं लक्ष्य किवी संघानं 5.2 षटकात 1 गडी गमावून सहज गाठलं.
न्यूझीलंड विरुद्ध युगांडा सामना संपताच या विश्वचषकात एक मोठा विक्रम रचला गेला. एका टी20 विश्वचषकात 10 वेळा 100 किंवा 100 पेक्षा कमी धावांवर संघ बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2024 विश्वचषकापूर्वी 2014 आणि 2021 च्या विश्वचषकात संघ 8 वेळा 100 किंवा 100 धावांच्या आत ऑलआउट झाले होते. आता तो रेकॉर्ड मोडल्या गेला आहे.
टी20 विश्वचषकात संघ 100 धावांच्या आत बाद किती वेळा बाद झाले
2024 टी20 विश्वचषक – 10 वेळा
2014 आणि 2021 टी20 विश्वचषक – 8 वेळा
2010 टी20 विश्वचषक- 4 वेळा
2007, 2009 आणि 2012 टी20 विश्वचषक – 3 वेळा
2016 टी20 विश्वचषक – 2 वेळा
2022 टी20 विश्वचषक – 1 वेळा
टी20 विश्वचषक 2024 मध्ये 100 धावांच्या आत ऑलआऊट होणारे संघ
श्रीलंका – 77/10 धावा (19.1 षटके)
युगांडा – 58/10 धावा (16 षटके)
आयर्लंड – 96/10 धावा (16 षटके)
पापुआ न्यू गिनी – 77/10 धावा (19.2 षटके)
न्यूझीलंड – 75/10 धावा (15.2 षटके)
युगांडा – 39/10 धावा (12 षटके)
नामिबिया – 72/10 धावा (17 षटके)
ओमान – 47/10 धावा (13.2 षटके)
पापुआ न्यू गिनी – 95/10 धावा (19.5 षटके)
युगांडा – 48/10 धावा (18.4 षटके)
महत्त्वाच्या बातम्या –
या 3 कारणांमुळे पाकिस्तानचा संघ टी20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला
टी20 विश्वचषकातील टॉप 5 रोमांचक सामने, ज्यात संघानं एका धावेनं विजय मिळवला
टी20 विश्वचषकातून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला दुहेरी झटका, 2026 च्या स्पर्धेत थेट एंट्री मिळणार नाही!