---Advertisement---

चमत्कारिक कामगिरी ‘विराटसेने’ला जमते! पहिल्या सामन्यातील पराभवानंतरही ट्रॉफी जिंकत ‘या’ यादीत भारत घेणार उडी?

On: सोमवार, ऑक्टोबर 25, 2021 10:50 AM
---Advertisement---

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने भारतीय संघाने त्यांच्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मोहिमेला सुरुवात केली आहे. रविवारी (२४ ऑक्टोबर) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात त्यांची पहिलीवहिली लढत झाली. पाकिस्तानच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत भारतावर दबाव बनवून ठेवला आणि अखेर १८ षटकांमध्येच १० विकेट्स राखून सामना खिशात घातला.

अशाप्रकारे भारताला टी२० विश्वचषकातील त्यांच्या पहिल्याच सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले. असे असले तरीही, भारतीय संघाकडे पुढे दमदार पुनरागमनासह जेतेपदावर शिक्कामोर्तब करत मोठा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे.

टी२० विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या इतिहासात तब्बल ३ संघांनी ही किमया साधली आहे. यामध्ये नुकत्याच भारताविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या पाकिस्तानचा पहिला क्रमांक लागतो. २००७ मध्ये टी२० विश्वचषकाची सुरुवात झाली होती. या पहिल्यावहिल्या हंगामातच पाकिस्तानने भारताच्या बरोबरीने प्रदर्शन करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. परंतु त्यावेळी अखेरच्या क्षणी जेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली होती.

मात्र पुढे २ वर्षांनी अर्थातच २००९ मध्ये पाकिस्तानने त्यांचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. विशेष म्हणजे, या हंगामातील पाकिस्तानच्या पहिल्याच सामन्यात त्यांना पराभवास सामोरे जावे लागले होते. इंग्लंडने त्यांना ४८ धावांनी पराभूत केले होते. पण पुढे दमदार पुनरागमन करत पाकिस्तानने अंतिम सामन्यात धडक मारली होती व श्रीलंकेचा ८ विकेट्सने धूळ चारत चषक उंचावला होता.

पाकिस्ताननंतर २०१० मध्ये इंग्लंड व पुढे २०१२ मध्ये वेस्ट इंडिज संघांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे यंदा आपल्या उद्घाटनाच्या सामन्यात निराशा हाती आलेला भारतीय संघ हा पराक्रम करू शकेल का नाही? हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

याला म्हणतात आदर! इतिहास रचल्यानंतर हात बांधून मेन्टॉर धोनीपुढे उभे राहिले पाकिस्तानचे खेळाडू- VIDEO

‘विराट’ मनाचा कोहली; पराभवानंतरही स्वत: विरोधक आझम, रिझवानला गाठलं आणि मारली मिठी

भारतावर पाकिस्तानचा ‘रिकॉर्डब्रेक’ विजय, क्रिकेटविश्वातील सुरमा संघांनाही न जमलेला केला पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---