दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार टेंबा बावुमाला गंभीर दुखापत झाली आहे. बुधवारी (२९ जून) बावुमाने इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतली. बावुमा इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसिय, तीन टी-२० आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सहभागी होणार होता. तसेच आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यातही त्याला सहभागी होता येणार नाही. भारताविरुद्ध खेळताना त्याच्या डाव्या कोपऱ्याला ही दुखापत झाल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. मालिका २-२ असा बरोबरीवर सुटली, पण त्यांचा कर्णधार टेंबा बावुमा (Temba Bavuma) दुखापतग्रस्त झाला. क्रिकेट दक्षिण आफ्रिका म्हणजेच सीएसएने दिलेल्या माहितीनुसार बावुमाला दुखापतीतून सावरण्यासाठी तब्बल ८ आठवडे लागू शकतात. यादरम्यानच्या काळात दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व केशव महाराज (Keshav Maharaj) करेल. तसेच टी-२० संघाची धुरा डेविड मिलरकडे (David miller) सोपवली जाईल.
दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा नियमित कर्णधार डीन एल्गर आहे, पण बावुमा कसोटी संघासाठी वरच्या फळीतील महत्वाचा खेळाडू आहे. सीएसएने त्याचा ३२ वर्षीय फलंदाज रिली रोसोयुला टी-२० संघात पुन्हा एकदा संधी दिली आहे. तो दक्षिण आफ्रिका संघासाठी शेवटचा सामना २०१६ साली खेळला होता. परंतु त्यानंतर तो इंग्लंडचा काउंटी संघ हॅपशरसोबत जोडला गेला होता.
दक्षिण आफ्रिकी संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाविषयी देखील महित्वाची माहिती समोर आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रबाडा सहभाग घेणार नाहीये. यादरम्यान त्याला विश्रांती दिली गेली आहे. दौऱ्यातील टी-२० आणि कसोटी मालिकेत मात्र तो स्वतःच्या संघासाठी उपलब्ध असेल. युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएट्जेला पहिल्यांदाच टी-२० संघात निवडले गेले आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका संघाच्या या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात १९ जुलै रोजी होईल. उभय संघात सर्वप्रथम एकदिवसीय मालिका खेळली जाईल, ज्याच्यानंतर टी-२० आणि शेवटी कसोटी मालिकेला सुरुवात होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताची चिंता वाढली, पाचव्या कसोटीत इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज करणार पुनरागमन
ENGvsIND: “विराटने शतक केले नाही तरी चालेल, मात्र…” वाचा नक्की काय म्हणाला द्रविड
ENGvsIND: इंग्लंडच्या फलंदाजाविरोधात बुमराह ऍण्ड कंपनीची काय असेल रणनीती? वाचा सविस्तर