आंद्रे अगासी हा अमेरिकन टेनिसच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू मानला जातो. आगासी टेनिस एकेरीमधील नंबर एकचा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत आठ ग्रँडस्लॅम किताब जिंकले आहेत. याचसोबत १९९६ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. इतकेच नव्हे तर तो सात ग्रँडस्लॅम स्पर्धांत तो उपविजेता राहिला आहे.
आंद्रे अगासी हा पहिला पुरुष टेनिस खेळाडू आहे, ज्याने चारवेळा ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकला आहे. त्याचा हा विक्रम काही काळानंतर नोव्हाक जोकोविचने मोडून काढला. आंद्रे आगासीच्या या विक्रमावरून तो किती मोठा खेळाडू आहे याची कल्पना येते. आंद्रे टेनिसमध्ये यश मिळण्यासाठी मैदानावर जितका प्रचंड मेहनत घ्यायचा तितकाच तो यशासाठी काही अंधविश्वास गोष्टींवर विश्वास ठेवायचा. यासाठी काही टोटके वापरायचा. हे टोटके वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हालं.
इतर खेळाडूंप्रमाणे आंद्रे देखील नेहमी प्रत्येक सामन्यात टोटके वापरायचा. टेनिसमध्ये क्रमांक एकचा खेळाडू राहिलेल्या आंद्रेने आपल्या कारकिर्दीविषयी खुलासा करताना सांगितले की, टेनिस स्पर्धेत अंडरवियर (अंतर्वस्त्र) न घालता सामने खेळायचा. अंडरवेअर न घालणे जिंकायचा त्यांच्या विजयासाठी शुभसंकेत असायचे.
आंद्रे आगासी सर्वात पहिल्यांदा फ्रेंच ओपनमध्ये अंडरवेअर न घालता कोर्टमध्ये उतरला होता. याबद्दल तो सांगताना म्हणाला की, फ्रेंच ओपनमध्ये माझा पहिलाच सामना एका मातब्बर खेळाडू विरोधी होणार होता. त्यावेळी मी माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन करत होतो.
सामन्याआधी मी जेव्हा माझ्या लॉकर रुममध्ये पोहोचलो होतो तेव्हा माझी अंडरवेअर विसरलो. माझ्या प्रशिक्षकांनी मला अंडरवेअर आणून देण्याचा प्रयत्न केला पण मी त्याला नकार दिला. त्यानंतर मी मैदानात अंडरवेअर न घालताच उतरलो हा सामना मी सहज जिंकलो. फ्रेंच ओपनची संपूर्ण स्पर्धा मी अंडरवेअर न घालताच खेळलो आणि हा किताब जिंकला. त्यानंतर मी कधीही कोणत्या स्पर्धेत अंडरवेअर घातली नाही.
आंद्रे आगासी आणखीनही काही टोटक्यांचा वापर करायचा जेव्हा तो टेनिस कोर्टवर उतरायचा तेव्हा तिथल्या पांढऱ्या रेषेवर कधीच पाय ठेवत नव्हता. यासोबत आगाशी तीन टेनिस चेंडू हातात घ्यायचा आणि त्यातील एक चेंडू बॉलबॉय कडे द्यायचा . यावरून असे लक्षात येते की, आंद्रे अगासी टेनिस मधल्या यशासाठी टोटक्यांचा आधार घ्यायचा आणि यश संपादन करायचा.