---Advertisement---

आजपासून ठाणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचा थरार

On: शनिवार, डिसेंबर 7, 2019 3:06 PM
---Advertisement---

ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित ६४ वी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०१९ च आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा दिनांक आज दिनांक ७ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०१९ दरम्यान पार पडेल. सदर स्पर्धा पुरुष व्यावसायिक, अ, ब आणि महिला गटात होईल. कै. अनिल शंकर जाधव क्रीडांगण, वृंदावन बस स्थानक समोर, श्रीरंग सोसायटी, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे.

स्पर्धेत पुरुष व्यावसायिक गटात ६०, पुरुष अ गटात ५७, पुरुष महिला गटात ३२ तर पुरुष ब गटात १९६ संघ सहभागी होणार आहेत. पुरुष अ व महिला गटातून ठाणे जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. चिपळूण येथे होणाऱ्या ६७ व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत हा संघ ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---