भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. बुधवारी (१७ ऑक्टोबर) भारताचा नवा टी२० कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १६४ धावा केल्या. भारतीय संघाने पाच गडी राखून सामना सहज जिंकला. या सामन्यात भारतीय संघाकडून दमदार अर्धशतक झळकावणाऱ्या सुर्यकुमारला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने हा पुरस्कार त्याच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसाठी असल्याचे म्हटले आहे. याशिवाय त्याने न्यूझीलंडच्या एका खेळाडूचे आभार देखील मानले आहेत.
न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात सुर्यकुमार यादवची बॅट चांगलीच तळपली. त्याने ४० चेंडूत ६२ धावांची अफलातून खेळी केली. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकार लगावले. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्याने हा पुरस्कार आपल्या पत्नीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून देत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय त्याने ट्रेंट बोल्टचे देखील आभार मानले आहे. कारण जेव्हा तो चार धावांवर होता, तेव्हा त्याला बोल्टने जीवदान दिले होते. पण सामन्यात त्याला बोल्टनेच त्रिफळाचीत केले.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले होते. न्यूझीलंड संघाने निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १६४ धावा केल्या आणि भारताला विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य मिळाले होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६२ धावा केल्या. त्याने कर्णधार रोहित शर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. रोहितने ४८ धावांचे योगदान दिले. डॅरिल मिशेलच्या डावातील शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर रिषभ पंतने चौकार मारून भारताला पाच गडी राखून विजय मिळवून दिला. तो १७ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने १७ धावा करून नाबाद परतला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्डने ३१ धावांत २ बळी घेतले, तर टीम साऊथी, मिशेल सँटनर आणि डॅरिल मिशेलने प्रत्येकी १ बळी घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
लयीत परतला भुवनेश्वर कुमार! वेगवान चेंडूवर उडवला न्यूझीलंडच्या सलामीवीराचा त्रिफळा, पाहा व्हिडिओ
टी२० विश्वचषकानंतर आयसीसी क्रमवारीत मोठे फेरबदल; केएल राहुल टॉप फाइव्हमधून बाहेर, तर विराट या स्थानी
रिषभ पंतच्या विजयी चौकाराने वर्ल्डकपच्या पराभवाचा आणि ‘या’ महत्वाच्या रेकॉर्डचाही ‘हिसाब बराबर’