---Advertisement---

पदार्पणात अर्धशतक करणाऱ्या ईशान किशनचे युवराजकडून कौतुक; म्हणाला, ‘आयपीएलमध्ये कमी वयात खेळण्याची…’

On: रविवार, मार्च 14, 2021 11:30 PM
---Advertisement---

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या ईशान किशनने अर्धशतकीय खेळी करत भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. अशातच सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने देखील ट्विट करत त्याचे कौतुक केले आहे.

आपल्या पदार्पणाच्या सामन्यात ईशान किशनने ३२ चेंडूत ५६ धावांची अर्धशतकिय खेळी केली. यासोबतच तो टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पनाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा अजिंक्य रहाणेनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

या खेळीनंतर युवराज सिंगने ट्विट करत त्याचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले की, “ईशान किशनचे स्वप्नवत पदार्पण. त्याच्या खेळात निर्भीडता दिसली. आयपीएलमध्ये कमी वयात खेळण्याची हीच सुंदरता आहे. तुम्हाला अशा वातावरणाची सवय होते आणि तुम्ही स्वत:ला चांगल्याप्रकारे व्यक्त करु शकता. कर्णधार विराटही त्याच्या लयीत परतला आहे. ”

इंग्लंड संघाने केल्या १६४ धावा

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. भुवनेश्वर कुमारने जोस बटलरला (०) धावांवर माघारी धाडले. त्यांनतर जेसन रॉय(४६),डेव्हिड मलान (२४),जॉनी बेअरस्टो (२०),मॉर्गन ( २८) ,बेन स्टोक्स ( २४) तर सॅम करनने नाबाद (६) धावा केल्या. २० षटकाअखेर इंग्लंड संघाने ६ बाद १६४ धावा केल्या होत्या.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करतांना वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी १ गडी बाद करण्यात यश आले.

७ गडी राखून भारतीय संघाने मिळवला विजय

भारताकडून १६५ धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीला उतरलेल्या केएल राहुलला चांगली सुरुवात करून देण्यात अपयश आले. तो ६ चेंडू खेळत शुन्य धावा करत माघारी परतला. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या ईशान किशनने कर्णधार विराट कोहलीसह मिळून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. तसेच ९४ धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला.

किशनने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकवत ५६ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने आक्रमक २६ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७३ आणि श्रेयस अय्यरने नाबाद ८ धावा करत भारताला हा सामना ७ विकेट्सने जिंकून दिला.

महत्त्वाच्या बातम्या – 

विजयी षटकार ठोकत विराट कोहलीने रचला इतिहास! ‘हा’ कारनामा करणारा जगातील पहिलाच क्रिकेटर

इशान किशनने अर्धशतकासह पदार्पण गाजवले! ‘असा’ कारनामा करणारा रहाणेनंतरचा ठरला दुसराच भारतीय

कुणीतरी येणार येणार गं..! ‘भज्जी’च्या घरी पुन्हा हालणार पाळणा, फोटो व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---