भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कडून माजी क्रिकेटपटूंना मोठा दिलासा देण्यात आला आहे. सोमवारी (१३जून) माजी क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला दोन्ही) आणि माजी पंचांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे..
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाले की, “आमच्या माजी क्रिकेटपटूंच्या आर्थिक हिताची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खेळाडू जीवनरेखा राहतात आणि एक मंडळ म्हणून त्यांचे खेळाचे दिवस संपले की त्यांच्या पाठीशी राहणे हे आमचे कर्तव्य आहे. पंच हे अस्पष्ट हिरो आहेत आणि बीसीसीआय त्यांच्या योगदानाची खरोखर कदर करते.”
बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) म्हणाले की, “आमच्या क्रिकेटपटूंचे कल्याण, मग ते माजी असोत किंवा वर्तमान हे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि पेन्शनची रक्कम वाढवणे हे त्या दिशेने एक पाऊल आहे. बीसीसीआय पंचांनी वर्षानुवर्षे केलेल्या योगदानाची कदर करते आणि भारतीय क्रिकेटसाठी त्यांच्या मेहनती सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. एकूण ९०० कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल आणि ७५ टक्के पेक्षा जास्त लाभार्थ्यांना १००टक्के वाढ मिळेल.”
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ (Arun Dhumal) यांनी सांगितले की, “आज बीसीसीआय जे काही आहे ते त्याच्या माजी क्रिकेटपटू आणि पंचांच्या योगदानामुळे आहे. मासिक पेन्शनमध्ये वाढ झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे जो आमच्या माजी क्रिकेटपटूंच्या कल्याणासाठी एक संकेत असेल.
बीसीसीआयने जारी केलेल्या पत्रकानुसार, ज्या खेळाडूंना याआधी प्रतिमहा १५ हजार रुपये मानधन मिळत होते त्यात वाढ करून त्यांचे मानधन प्रतिमहा ३०हजार इतके करण्यात आले आहे. सोबतच ज्या खेळाडूंना प्रतिमहा २२हजार ५०० रुपये मिळत होते त्यांना यापुढे ४५हजार मिळतील. ज्या खेळाडूंना ३०हजार रुपये मिळत होते त्यांना यापुढे ५२हजार ५०० रुपये, ज्यांंना याआधी ३७हजार ५० रुपये मिळत होते त्यांना यापुढे ६०हजार, तर ज्यांना याआधी प्रतिमहा ५०हजार रुपये मिळत होते त्यांना यापुढे ७०हजार रुपये मिळतील असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, बीसीसीआयकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. शिवाय भारतासाठी खएळलेल्या अनेक माजी खेळाडूंना बीसीसीआयच्या या निर्णयाचा निश्चितपणे फायदा होईल हे यावरून स्पष्ट होत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘हार्दिक सध्याचा सर्वात वैविध्यपूर्ण खेळाडू’, भारताच्या माजी प्रशिक्षकाने केली पंड्याची प्रशंसा
रिषभ पंतच्या भारतीय संघाला ‘या’ चुका पडल्या भारी, गमावली सलग दुसरी टी२०