कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे कोणालाही घरातून बाहेर पडता येत नाही. अशा परिस्थितीत क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेटप्रेमींसाठी २००० च्या दशकातील ऐतिहासिक सामने पुन्हा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता क्रिकेटच्या चाहत्यांना कंटाळा येण्याचा प्रश्नच उरत नाही. हे सामने मंगळवारपासून (७ एप्रिल) डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या चॅनेलवर भारताचे इतर काही आठवणीतील सामन्यांचे हायलाईट्स दाखविले जाणार आहेत. हा निर्णय बीसीसीआय आणि भारत सरकारने घेतला आहे.
हे ऐतिहासिक सामने १४ एप्रिलपर्यंत दाखविले जातील. १३ एप्रिलला २००१मध्ये कोलकाता येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला कसोटी सामना दाखविण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman) २८१ धावांची तूफान खेळी केली होती.
त्याचबरोबर १४ एप्रिलला भारत विरुद्ध श्रीलंका संघात २००५ साली खेळण्यात आलेला वनडे सामना दाखवणार आहेत. या ८ दिवसांमध्ये डीडी स्पोर्ट्सवर (DD Sports) १९ वनडे आणि एकमेव कोलकातामध्ये खेळण्यात आलेला कसोटी सामना दाखविला जाणार आहे.
मंगळवारी (८ एप्रिल) भारत-ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघात २००३मध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील ३ सामन्यांचे हायलाईट्स दाखविणार आहेत.
यावेळी मालिकेतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्यात आलेला दुसरा वनडे सामना सर्वात पहिला दाखविला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने ३७ धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळविला होता. तसेच लक्ष्मणने सर्वाधिक १०२ आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १०० धावांची शतकी खेळी केली होती.
तरीही या तिरंगी मालिकेतील (Tri-Series) अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस नियमाने ३७ धावांनी जिंकला होता.
याव्यतिरिक्त भारतातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलही (IPL) १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. यापूर्वी आयपीएलचे आयोजन २९ मार्चला होणार होते. परंतु आता आयपीएल रद्द होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण या व्हायरसचा प्रादुर्भाव अधिकच वाढत आहे.
भारतात सध्या ५००० पेक्षा अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. तर १६५ लोकांनी आपला जीव गमावला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
-शतक कायमचे रुसलेले पण वनडेत सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज
-आणि वैतागलेल्या इरफान पठाणने शेअर केले थेट स्क्रीनशाॅट