भारतीय कर्णधार विराट कोहलीने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये देशासाठी पदक जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर विराटने पदकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देखील दिले. कोहलीने भारतीय खेळाडूंना मंगळवारी आभासी पत्रकार परिषदेदरम्यान विराट कोहलीने बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी देशासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांचे कौतुक केले आहे.
विराट कोहलीने स्पष्ट केले की, इंग्लंडमध्ये असूनही टोकियो ऑलिम्पिक २०२० मधील भारताच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीवर आमचे लक्ष होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंचा भारताच्या कसोटी संघाला खूप अभिमान वाटत आहे. उन्हाळी ऑलिम्पिकच्या पहिल्या १२ दिवसांच्या आत भारतीय तुकडीने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये रौप्य आणि कांस्य अशी दोन पदके जिंकली आहेत.
सध्या विराट भारतीय कसोटी संघासह इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (४ ऑगस्ट) ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी विराटने पत्रकारांशी संवाद साधला.
विराट म्हणाला की, “आम्ही सर्व ऑलिम्पिक सामने उत्सुकतेने पाहत आहोत. डरहॅममध्ये नाष्टा करताना आम्ही मोठ्या स्क्रीन ऑलिम्पिकचे सर्व खेळ पाहत होतो. विशेषत: आमचे खेळाडू जेव्हा कामगिरी करत होते, तेव्हा आम्ही सर्व लक्षपूर्वक पाहात होतो. ”
कोहली पुढे म्हणाला की, “आपल्या सर्वांसह संपूर्ण देशाला पदक विजेत्या खेळाडूंचा खूप अभिमान आहे आणि जे लोक स्पर्धेत खूप पुढे गेले आहेत, ज्यांनी पदके जिंकली नसतील, पण त्यांनी चांगली स्पर्धा केली आणि त्यांचे सर्वोत्तम दिले. आम्ही उत्सुकतेने पाहात आहोत आणि त्यांना पाठिंबा देत आहे.”
.@imVkohli on #TeamIndia following & supporting the Indian athletes at @Tokyo2020. 👍 👍 pic.twitter.com/vfxbwu6xXu
— BCCI (@BCCI) August 3, 2021
भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा सलामीचा सामना बुधवारी ट्रेंट ब्रिजवर खेळायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिजसाठी पाऊस बनला खलनायक, पाकिस्तानने जिंकली टी२० मालिका
केकेआरच्या अडचणीत वाढ, ‘या’ कारणामुळे सर्वात महागड्या खेळाडूची उर्वरित हंगामातून माघार
ENGvIND: भारताची प्लेइंग इलेव्हन पाहून भडकले नेटकरी, ‘या’ खेळाडूला बाहेर केल्याने घेतला समाचार