---Advertisement---

क्रिकेट जगतात दु:खाचे वातावरण, महान क्रिकेटपटूचा झोपेतच मृत्यु

---Advertisement---

भारताच्या सर्वात वृद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटपटूपैंकी एक असणारे वॉल्टर डिसूझा यांचे गुरुवारी (९ एप्रिल) सकाळी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांनी खार येथील त्यांच्या निवासस्थानी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. डिसूझा यांच्या मृत्यूने संपूर्ण क्रिकेट जगतात दु:खाचे सावट पसरले आहे.

डिसूझा (Walter D’Souza) यांनी गुजरातकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. त्यांनी १९५०-५१ साली गुजरातकडून इंदोरमधील होळकर स्टेडियममध्ये रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात त्यांनी २ डावात अनुक्रमे ५०आणि ७७धावा केल्या होत्या.

डिसूझा यांची प्रथम श्रेणी कारकिर्द जवळपास २० वर्षांची होती. त्यांनी १९४७पासून ते १९६६ पर्यंत गुजरातकडून (Gujrat) प्रथम श्रेणी क्रिकेट (First Class Cricket) खेळले होते. या काळात १६ सामन्यात त्यांनी ३५.६९च्या सरासरीने ८२१ धावा केल्या होत्या. तसेच ४४.५७च्या सरासरीने ७ विकेट्सही घेतल्या होत्या.

ट्रेंडिंग घडामोडी-

-जोगिंदर शर्मा म्हणतो, या कारणामुळे मी घरीच जात नाही

-एका वर्षात सर्वाधिक वनडे धावा करणारे ५ खेळाडू

-भारताकडून वनडे पदार्पणातचं दणक्यात सुरुवात करणारे ५ फलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---