---Advertisement---

हा क्रिकेटर ७ वर्षांचा असताना वडिलांचा झाला मृत्यु, आईला दिलेले वचन केले पुर्ण

On: मंगळवार, एप्रिल 7, 2020 5:30 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सर्वात मोठा सामना विजेता म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. उजव्या हाताच्या या गोलंदाजाने त्याच्या वेगवान गोलंदाजीने जगभरातील सर्व संघात दहशत निर्माण केली आहे. तसेच बुमराहचा यॉर्कर आणि स्लोअर यॉर्करही विरुद्ध संघातील फलंदाजांसाठी मोठा चिंतेच विषय बनला आहे.

मात्र, खूप कमी लोकांना हे माहिती आहे की बुमराहकडे यॉर्कर टाकण्याची ही अनोखी शैली कुठून आली? तर, जाणून घेऊया बुमराहच्या यॉर्कर किंग बनण्यामागची कहाणी.

बुमराह (Jasprit Bumrah) जेव्हा ७ वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हा बुमराहने त्याच्या आईला वचन दिले होते की तो त्याचे नाव मोठे करून दाखवेल.

तो अवघ्या १२ वर्षांचा असताना उन्हाळ्यात दुपारी घरी गोलंदाजीचा सराव करत असायचा. त्यामुळे घरात खूप आवाज व्हायचा आणि दुपारी त्याच्या आईच्या झोपेत अडथळा निर्माण व्हायचा. नेहमी नेहमी बुमराहच्या चेंडूच्या आवाजाला त्रासून त्याच्या आईने त्याच्यापुढे एक अट ठेवली होती. ती अशी की, जेव्हा तो कमीतकमी आवाज करत गोलंदाजी करेल, तेव्हाच त्याने घरात गोलंदाजी करायची संधी मिळेल.

यावर बुमराहने जबरदस्त तोडगा काढला होता. तो चेंडूचा टप्पा अशा ठिकाणी टाकायचा जिथे फरशी आणि भिंतींचा खालचा भाग एकत्र जुळतो. यामुळे चेंडूचा आवाज कमी यायचा आणि विशेष म्हणजे यामुळे बुमराहचा यॉर्करदेखील (Yorker) परिपूर्ण झाला.

असे असले तरी, बुमराहला त्याच्याचील यॉर्कर टाकण्याच्या कौशल्याची जाणीव आयपीएलमधील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून गोलंदाजी करताना झाली. त्यावेळी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) बुमराहला यॉर्कर आणि स्लोअर यॉर्करविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्याच्या या मोलाच्या मार्गदर्शनामुळे बुमराह आज मोठा गोलंदाज बनला आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-५ भारतीय क्रिकेटपटूंची अतिशय वादग्रस्त वक्तव्य, ज्यामुळे देशात झाला होता राडा

-आयसीसी वर्ल्ड ११कडून खेळणारे ३ भारतीय महान क्रिकेटपटू

-आशिया ११कडून खेळलेले ५ महान भारतीय क्रिकेटर्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---