संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहे. या व्हायरसचा नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर अनेक खेळाडू आपापल्या परीने या व्हायरसविरुद्धच्या लढाईत मदत करत आहेत.
अशाच प्रकारे या व्हायरसविरुद्धच्या लढाईत या महिन्याच्या सुरुवातीला महिला टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी अष्टपैलू क्रिकेटपटू ऋचा घोषने (Richa Ghosh) १ लाख रुपयांची मदत (Help of 1 Lakh Rupees) केली आहे.
ऋचाने बंगाल मुख्यमंत्री मदत निधीमध्ये आपले योगदान दिले आहे. १६ वर्षीय ऋचाच्या वडिलांनी सिलीगुडी येथील जिल्हाधिकारी सुमंत सहाय (Sumant Sahay) यांना १ लाख रुपयांचा चेक दिला आहे.
टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळणारी ऋचा म्हणाली की, “प्रत्येकजण कोविड-१९ विरुद्ध लढत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या व्हायरसविरुद्धच्या लढाईत एकत्र येण्यासाठी आवाहन केले आहे. त्यामुळे मी देशाची एक जबाबदार नागरिक म्हणून योगदान देण्याचा विचार केला.”
#Richa donates 1 Lakh#India & #Bengal Women cricketer Richa Ghosh donated Rs. 1 Lakh to State Emergency Relief Fund to help combat #COVID19 pandemic today in Siliguri.
The youngster's father handed over a cheque of Rs. 1 Lakh to Siliguri District Magistrate Sumanta Sahay.#CAB pic.twitter.com/Cg4m8BtR1q— CABCricket (@CabCricket) March 28, 2020
टी२० विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) ऋचाने ऑस्ट्रेलियात झालेल्या तिरंगी मालिकेतून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केेले होते. भारतीय संघात १६ वर्षीय ऋचा आणि शफाली वर्मा (Shafali Verma) या दोन खेळाडू होत्या. ज्यांनी टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता. यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियाने ८५ धावांनी पराभूत केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-जेव्हा ग्राऊंड्समनला दिला होता मॅन ऑफ द मॅच पुरस्कार
-एकही विकेट, धाव किंवा झेल न घेणाऱ्या खेळाडूला जेव्हा मिळतो मॅन ऑफ द मॅच
-धोनीला क्रिकेटमधून कमवायचे होते फक्त ३० लाख रुपये