---Advertisement---

रोहितच्या लग्नात विराटने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसोबत धरला होता ठेका, जुना व्हिडिओ तुफान व्हायरल

On: शुक्रवार, फेब्रुवारी 24, 2023 9:15 PM
Virat Kohli Sonakashi Sinha
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीला डान्स करण्याची आवड आहे, हे त्याच्या चाहत्यांना वेळोवेळी दिसून आले आहे. त्याने आतापर्यंत अनेक वेळा पार्टी, मित्रांच्या लग्नात आणि लाईव्ह सामन्यात डान्स केला आहे. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत विराट बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत डान्स करत आहे.

विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक आहे. सचिन तेंडुलकरनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा हा फलंदाज नेहमीच चर्चेत असतो. त्याचे लाईव्ह सामन्यातील मजेदार व्हिडिओही अनेकदा व्हायरल होत आहे. पण यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडिओत विराटसोबत बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakashi Sinha) दिसत असल्यामुळे व्हिडिओत वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या लग्नातील आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रितिका सजदेह (Ritika Sajdeh) यांचे लग्न 13 डिसेंबर 2015 रोजी झाले होते. लग्नात भारतीय संघातील खेळाडू आणि बॉलिवुड जगतातील अनेक चेहरे उपस्थित होते. विराट सहकारी खेळाडूच्या लग्नात चांगलाच एन्जॉय करताना दिसत आहे. विराट आणि सोनाक्षीने ‘साडी के फॉल सा…’ या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे.

https://twitter.com/TrophyHeist/status/1627155311579787265?s=20

दरम्यान, विराटला डान्ससोबतच गाण्यांची देखील आवड आहे. त्याने स्वतःच्या लग्नात पत्नी अनुष्कासाठी एक गाणे गायले होते. त्याने अनेकदा असा खुलासाही केला आहे की, त्याला पंजाबी गाणे आवडतात. गुरदास मान हा त्याचा आवडता गायक आहे. विराटच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने भारतासाठी आतापर्यंत 106 कसोटी, 271 वनडे आणि 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने अनुक्रमे 8195, 12809 आणि 4008 धावा केल्या आहेत. सध्या विराट भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळत आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने विजय मिळवला असून 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
(The dance performed by Virat Kohli and Sonakshi Sinha at Rohit Sharma’s wedding is currently going viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मायकल हसीकडून भारताच्या ‘या’ फलंदाजाचे कौतुक, स्वतःच्या संघाला सुनावले खडेबोल
‘विलन’बनण्याच्या मार्गावर असलेली एलिस पेरी बनली स्टार! ‘या’ डाईव्हमुळे भारत विश्वचषकातून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---