इंग्लंड संघ सध्या दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघांतील पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनर याने कसोटी पदार्पण केले. कसोटी पदार्पण हा कोणत्याती क्रिकेटपटूच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो, पण याच आनंदाच्या क्षणी टिकनरसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. न्यूझीलंडमध्ये आलेल्या एका चक्रीवादळात टिकणरचे घर उद्ध्वस्त झाले आहे.
ब्लेयर टिकनर (Blair Tickner) याने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून या चक्रीवादळाची माहिती सर्वांसोबत शेअर केली. या पोस्टमध्ये एकूण 9 फोटो शेअर केले आहेत. पोस्टमध्ये टिकनरच्या घराची झालेली दुरावस्ता चाहत्यांना स्पष्टपणे दिसू शकते. टिकनरने ही पोस्ट सेअर करत सर्वांकडे घर आणि झालेले नुकताना भरून निघावे यासाठी मदत माहिती आहे. न्यूझीलंड दौऱ्यात इंग्लंडने पहिला कसोटी सामना 268 धावांनी जिंकला. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनरने या वादळामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली. यावेळी टिकनरला स्वतःच्या भावना अनावर झाल्या आणि डोळ्यांतील पाणीही पाहायला मिळाले.
https://www.instagram.com/p/Co6u5hPB-mI/?utm_source=ig_embed&ig_rid=ba9e717c-e91b-4f47-af65-b36b20ee29d8
सामना संपल्यानंतर टिकनर त्याची घरी जाऊन वादळामुळे नुकसान सोसावे लागणाऱ्या लोकांची मदत करतानाही दिसला. टिकनर म्हणाला, “माझ्या वडिलांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तिथे जाऊन मी त्यांची मदत केली. संपूर्ण परिसरासाठी हा कठीण काळ आहे आणि शक्य तेवढी सगळी मदत मी करत आहे. ही वेळ खूप अडचणींची आहे, पण आम्ही एकमेकांसोबत आहोत. माझे लहानपण याठिकाणी गेले आहे आणि त्यामुळे यावर बोलणे मला खूप कठीण जात आहे. जेव्हा तुम्ही कसोटी पदार्पण करता तेव्हा तुमचे कुटुंब त्याठिकाणी असेल, अशी अपेक्षा असते. माझी वडील सामना पाहण्यासाठी आले होते, पण लोकांची मदत करण्यासाठी ते तेथून जनरेटर घेऊन माघारी निघाले. माझ्या कसोटी पदार्पणावेळी वडिलांनी फक्त अर्धा तास सामना पाहिला आणि तोपर्यंत मी पहिली विकेट घेतली होती. नंतर सात तास प्रवास करून ते घरी पोहोचले.”
दरम्यान टिकणरने या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात एक, तर दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेतल्या. उभय संघांतील कसोटी मालिकेचा दुसरा सामना 24 फेब्रुवारीपासून सुरू होईल. (The home of Blair Tickner, who made his Test debut against England, has been destroyed by a cyclone)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बला’त्काराच्या आरोपाखाली क्रिकेटरने खाल्ली जेलची हवा, पण जामीन मिळताच कमबॅक करत फलंदाजांचा काढला घाम
आयपीएलप्रेमींवर अंबानी मेहरबान! आता फुकटात पाहता येतील सर्व सामने, खर्च केलेत ‘एवढे’ बिलियन डॉलर्स