आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यावर्षीपासून दरमहिन्याला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार द्यायला सुरुवात केली होती. त्यानुसार 7 जुलै रोजी आयसीसीने जून महिन्यातील पुरस्कारासाठी नामांकित खेळाडूंची नावे घोषित केली आहेत. जून महिन्यातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूसाठी भारतीय महिला संघातील आक्रमक युवा फलंदाज शेफाली वर्मा आणि अष्टपैलू खेळाडू स्नेह राणा या दोघींनाही मानांकन मिळाले आहे. तसचे इंग्लंडची डावखरी फिरकीपटू सोफी इक्लेस्टोनला देखीलही नामांकन देण्यात आले आहे.
त्याचबरोबर आयसीसीने जून महिन्यातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूसाठी न्यूझीलंडचा फलंदाज डेवोन कॉनवे, वेगवान गोलंदाज काइल जेमीसन यांच्या व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक यांना नामांकन देण्यात आले आहे.
क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपामध्ये सर्वांना प्रभावित करणारी 17 वर्षीय शेफालीने इंग्लंडविरुद्ध जून महिन्यात कसोटी पदार्पण करताना सर्वांना प्रभावित केले. तिने दोन्ही डावात अर्धशतकांसह 96 आणि 63 धावा केल्या. पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात अर्धशतके झळकवणारी ती भारताची पहिली आणि जगातील चौथी खेळाडू बनली. तिने इंग्लंडविरुद्ध जून महिन्यात दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये 85.50 च्या स्ट्राईक रेटने 59 धावा केल्या.
त्याचबरोबर अष्टपैलू स्नेह राणानेदेखील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसर्या डावात 154 चेंडूंत नाबाद 80 धावांची खेळी करत सामना अनिर्णित ठेवण्यात मदत झाली. तिने गोलंदाजी करताना पहिल्या डावात 131 धावा देऊन चार बळीही घेतले. तसेच तिने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात तिने 43 धावा देऊन एक बळीही घेतला आहे.
त्याचबरोबर इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू इक्लेस्टोन हा भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. या सामन्यात 25.75 सरासरीने 8 विकेट घेतल्या. तिने दोन्ही डावात प्रत्येकी 4 विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर दोन एकदिवसीय 12.16 च्या सरासरी आणि 3.65 च्या इकोनॉमी रेटने 6 बळी घेतले होते.
पुरुष गटातील नामांकन मिळालेल्या कॉनवेने जून महिन्यामध्ये लॉर्ड्स येथे कसोटी पदार्पण दुहेरी शतक झळकावले. पुढील दोन कसोटी सामन्यात त्याने दोन अर्धशतके झळकावली. ज्यात भारताविरुद्ध आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्याचा समावेश आहे. त्याने या महिन्यात ३ कसोटीत 63.16 च्या सरासरीने 379 धावा केल्या.
जेमीसन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. त्याने या अंतिम सामन्यात 61 धावा देत 7 विकेट घेतल्या. त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला दोन्ही डावात बाद केले. त्याच्या व्यतिरिक्त रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत या फलंदाजाना बाद केले. त्याने जूनमध्ये 2 कसोटी मध्ये 17.40 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या.
तसेच डी कॉकने जून महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत १४१ धावांची खेळी केली. तसेच दुसऱ्या कसोटीत ९६ धावांची खेळी केली. याबरोबरच ३ टी२० सामन्यांमध्ये त्याने १३५ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कॅप्टनकूल’ धोनीने सावरली या ५ खेळाडूंची कारकिर्द, नाहीतर अवघड होते…
शुबमन गिलला बीसीसीआयने इंग्लंडमधून बोलवले परत; मात्र, बदली खेळाडूचा प्रश्न कायम
वाढदिवस विशेष: एमएस धोनीच्या करियरची टाईमलाईन