भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना बुधवारी (1 जानेवारी) अहमदाबादमध्ये खेळला गेला. उभय संघांतीत हा सामना सुरू होण्याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याकडून 19 वर्षांखालील भारताच्या महिला संखाचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी बीसीसीआय अध्यक्ष रॉयज बिन्नी, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सचिव जय शहा उपस्थित होते.
भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघाने नुकताच आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकला. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या 19 वर्षांखाली महिला टी-20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड संघ अंतिम सामन्यात पोहोचले. अंतिम सामन्यात हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने असताना भारताने मात्र चमकदार कामगिरी करत सामना 7 विकेट्स राखून जिंकला आणि विश्वचषक ट्रॉफी जिंकली. महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालिल विश्वचषक आयसीसीने पहिल्यांदाच आयोजित केला असून भारताने विजेतेपदाचा मान पटकापला.
Sachin Tendulkar scored his maiden Test double century – in another IND-NZ match at the same ground. pic.twitter.com/wpio4pV3Ud
— Kausthub Gudipati (@kaustats) February 1, 2023
जगात देशाचे नाव केल्यानंतर भारताचा युवा महिला संघ मायदेशात परतला आणि बीसीसीआय सचिव जय शहा यांनी त्यांना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर आमंत्रित केले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना सुरू होण्याआधी या युवा खेळाडूंना सन्मानित केले गेले. यावेळी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हणाला, “मी 19 वर्षांखालील या संघाला शुभेच्छा देऊ इच्छितो. संपूर्ण देश या विजयाचा आनंद साजरा करत आहे. येत्या काळाच लोकांना यातून प्रेरणा मिळेल. तुम्ही विश्वचषक जिंकून युवा खेळाडूंना क्रिकेट खेळण्यासाटी प्रेरित केले आहे. मला आशा आहे तुम्ही पुढेही असेच प्रदर्शन कराल.”
"The entire nation will celebrate and cherish your victory"
Master Blaster @sachin_rt delivers a speech at the Narendra Modi Stadium, Ahmedabad as the BCCI felicitates the victorious U19 Women's Team at the #U19T20WorldCup
Listen in here👇👇 #TeamIndia @JayShah pic.twitter.com/7JokVkjOVy
— BCCI (@BCCI) February 1, 2023
बीसीसीआयने यावर्षी महिला इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन करण्याचा विचार केला आहे. याविषयी बोलताना सचिन म्हणाला, “डब्ल्यूपीएल खूपच मोठी स्पर्धा आहे. मी पुरुष आणि महिलांसाठी समान विचार करतो. बीसीसीआय आणि महिला खेळाडूंनी या लीगच्या आयोजनासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो.”
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाती भारतीय संघ 4 बाद 234 धावांपर्यंत मजल मारू शकला. शुबमन गिल याने या सामन्यात वादळी खेळी केली आणि कारकिर्दीतील पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. गिलने एकूण 63 चेंडू खेळले, ज्यामध्ये 12 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 126 धावा केल्या. (The Indian Women’s Under-19 team was honored by the BCCI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूची मोठी घोषणा, कसोटी क्रिकेटमधून घेतला अनिश्चित काळासाठी ब्रेक
अर्थसंकल्पात क्रीडाक्षेत्राला मिळाले भरभरून! इतिहासात प्रथमच 3000 पेक्षा जास्त कोटींची तरतूद