भारतीय संघाचा (Team India) माजी दमदार सलामीवर फलंदाज विरेंद्र सेहवागची (Virender Sehwag) पत्नी आरती सेहवाग (Aarti Sehwag) यांना जिल्हा न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. गौतमबुद्ध नगर जिल्हा न्यायालयाने आरती सेहवाग यांच्याविरोधात चेक बाऊन्स प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, जे मंगळवारी (२२ फेब्रुवारी) मागे घेतले गेले.
आरती सेहवाग यांच्याविरुद्ध २.५ कोटी रुपयांचा चेक बाऊन्स प्रकरणात मागील काही काळापासून न्यायालयात केस चालू होती. त्यामुळे त्यांना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या, पण मागच्या काही काळापासून त्यांनी न्यायालयात हजेरी लावली नव्हती. याच पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयाकडून त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले गेले होते, जे आता मागे घेतले गेले आहे. मंगळवारी आरती न्यायलयात हजर झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हा अजामीनपात्र वॉरंट मागे घेण्यासाठी अर्ज दिला होता. न्यायालयानेही त्यांचा हा अर्ज स्वीकारला आणि त्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
https://www.instagram.com/p/CXjF0MrJAGR/?utm_source=ig_web_copy_link
अभिवक्ता विरेंद्र नागर यांनी सांगितले की, चेक बाऊन्स प्रकरणात आरती जामीनावर बाहेर होत्या, पण त्या बऱ्याच काळापासून न्यायालयात येत नव्हत्या आणि त्यांच्या वकिलानेही यासंदर्भात कसलाही अर्ज दिला नव्हता. न्यायालयाने त्यांचा जामीन स्वीकार केला आहे. दरम्यान, आरती मागच्या जवळपास दोन वर्षांपासून न्यायालयात हजर झाल्या नव्हत्या. यापूर्वी त्या ५ जुलै, २०१९ मध्ये न्यायालयात हजर झाल्या होत्या. त्यानंतर थेट अजामीनपात्र वॉरंट निघाल्यानंतर त्यांनी न्यायालयाचे तोंड पाहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरती विरेंद्र सेहवाग यांची एका कंपनीमध्ये भागीदारी आहे, जी फळांपासून वेगवेगळी उत्पादने तयार करते. या कंपनीचे नाव एसएमजीके ऍग्रो प्रोडक्टस असे सांगितले जात आहे. ही कंपनी दिल्लीच्या अशोक विहार परिसरात आहे. त्यांनी लखनपाल प्रमोटर्स एँड बिल्डर्स कंपनी यांची मोठी ऑर्डर घेतली होती, पण ही पूर्ण करता आली नाही. यानंतर एसएमजीके कंपनीला त्यांचे पैसे परत करायचे होते आणि कंपनीने ग्राहकाची ही रक्कम चेकच्या रूपात चुकती केली होती. परंतु हा चेक नंतर बाऊन्स झाला होता. याच प्रकरणात आरतीविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या-