भारतीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधना ही फक्त आपल्या उत्कृष्ट फलंदाजीनेच नाही तर आपल्या सौंदर्यामुळेही खूप प्रसिद्ध आहे. स्म्रीतीच्या सुंदरतेवर अनेक चाहते फिदा आहेत. तिला सोशल मीडियावर अनेकजण फॉलो करतात. भारतीय संघातील इतर महिला खेळाडूच्या मानाने तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.
चाहत्यांची नॅशनल क्रश
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू स्म्रीती मंधनाचे चाहते तिला नॅशनल क्रश म्हणतात. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर देखील तिच्या पोस्ट केलेल्या फोटो किंवा व्हिडीओला खूप मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि शेअर केले जाते.
स्म्रीती लव्ह की अरेंज मॅरेज करेल?
मागील काही दिवसांपासून स्म्रीती मंधनाचा एक खूप जुना ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरंतर एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला होता की, ‘तुला कशा प्रकारे लग्न करायला आवडेल, लिव्ह मॅरेज की मग अरेंज मॅरेज?’ या प्रश्नावर स्म्रीतीने ‘लव्ह-रेंजड’, असे उत्तर दिले होते.
सध्या तिचे कारकिर्दीकडे आहे लक्ष
भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधनाने वयाच्या 17 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सध्या ती 24 वर्षांची असून ते आपल्या कारकिर्दीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी खूप कष्ट घेत आहे. सध्या तरी ती लग्न करणार नसल्याचे सांगितले आहे. परंतु तिने फार पुर्वीच तिला कशाप्रकारे लग्न करायला आवडेल, स्पष्ट केले आहे.
लहान वयात केली मोठी कामगिरी
भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधनाने लहान वयात खूप मोठी कामगिरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 4 शतकांची नोंद आहे. 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलेली स्म्रीती आज क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघाची प्रमुख खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो ५-६ वर्षांपुर्वीसारखा खेळाडू राहिला नाही,’ रहाणेच्या फ्लॉप कामगिरीवर माजी क्रिकेटर नाराज
‘माझ्यातील धावांची भूक अजूनही संपलेली नाही,’ विश्वविक्रम करणाऱ्या ३८ वर्षीय क्रिकेटरची प्रतिक्रिया
श्रीलंका-भारत मालिकेसाठी समालोचकांच्या पॅनेलची घोषणा, आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ शिलेदाराचाही समावेश