भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना बुधवारी (२८ जुलै) पार पडला आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने पहिल्या सामन्यातील पराभवाचे जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय संघावर ४ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ड्रेसिंग रूममधून धावत बाहेर आले होते. त्यावेळी त्यांच्या हातात एक चिठ्ठी होती. काय लिहिलं होत त्या चिठ्ठीमध्ये?
या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघासमोर विजयासाठी १३३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने २ चेंडू शिल्लक असताना सामना आपल्या नावावर केला. परंतु १८ व्या षटकात पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी श्रीलंकेच्या धावा ६ बाद ११३ धावा होत्या.
मैदानात पावसाचे आगमन होताच प्रशिक्षक राहुल द्रविड ड्रेसिंग रूममधून धावत बाहेर आले होते. त्यांनी बाहेर येऊन १२ व्या खेळाडूची भूमिका पार पाडत असलेल्या संदीप वॉरियरच्या हातात एक चिठ्ठी दिली आणि इशारा करत ती चिठ्ठी मैदानातील भारतीय संघापर्यंत पोहचवण्यास सांगितले. कदाचित राहुल द्रविड यांना आपल्या खेळाडूंपर्यंत ही माहिती पोहचवायची होती की, जर पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला; तर डकवर्थ लुईस नियमानुसार १८ व्या षटकापर्यंत श्रीलंका संघाच्या एकूण धावा किती असायला हव्यात, हे कळवायचे होते.
ज्यावेळी पाऊस आला त्यावेळी श्रीलंका संघ ३ धावांनी मागे होता. परंतु हा पाऊस काही वेळातच थांबला झाला होता. (The reason why India coach rahul Dravid sent a 12th man on the park with a chit during second T20I)
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ४० धावांचे योगदान दिले होते. तर आपला पहिलाच टी-२० सामना खेळत असलेल्या देवदत्त पडिक्कलने २९ धावांचे योगदान दिले होते. तसेच सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाडने २१ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. या सामन्यात भारतीय संघाला २० षटकअखेर ५ बाद १३२ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाकडून धनंजय डी सिल्वाने अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ४० धावांची खेळी केली. तसेच मिनोद भानुकाने ३६ धावांचे योगदान देत हा सामना श्रीलंका संघाला ४ गडी राखून जिंकून दिला. यासह ही मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘खेळाडूंना बाकावर बसवण्यासाठी किंवा सुट्ट्यांसाठी निवडलं जात नाही’, प्रशिक्षक द्रविडचे वक्तव्य
आधीच धक्के बसलेल्या टीम धवनसाठी वाईट बातमी! ‘हा’ खेळाडू तिसऱ्या टी२०तून होऊ शकतो बाहेर
अव्वल फिरकीपटू असो वा वेगवान गोलंदाज, ‘या’ ३ फलंदाजांनी प्रतिस्पर्धींना सदैव चोप दिला