कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लाॅकडाऊन करण्यात आले आहे. २५ मार्च पासून संपूर्ण भारतातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण याचवेळी मोठे मोठे खेळाडू घरातच असताना पोलीस खात्यात असणारे कबड्डीपटू रस्तावर उतरून आपली ड्युटी करत आहे. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत लोकांची मदत करत आहे. तर संचारबंदी असताना बाहेर फिरणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी धडाही शिकवत आहेत.
महाराष्ट्रातील सांगली जिल्हात कोरोनाने थैमान घातलं आहे. इस्लामपूर शहरात २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सांगलीत पोलिसांचा बंदोबस्त असताना काही टवळखोर मुले अजूनही रस्तावर फिरत आहेत. अशांना पोलीस चांगलाच धडा शिकवत आहेत. असाच मिरज सांगलीत महाराष्ट्र संघातील व महाराष्ट्र पोलीस कबड्डी संघातील कबड्डीपटू रोहित बने पोलीस दलात आहे. नुकत्याच ६७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत रोहित बने ने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे.
https://www.instagram.com/p/B-Wq10SJ9hO/?igshid=aidnrna7m491
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहित ड्युटी करत असताना त्याने रस्तावर फिरणाऱ्या तरुणांना त्याने चांगलीच शिक्षा दिली. रोहित बने ह्याने या तरुणांना उठाबश्या काढायला लावल्या. रोहित बने सध्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात सांगली पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, आयपीएस संदीप गिल तर ट्राफिक इंचार्जे एपीआय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे.