---Advertisement---

अश्विनच्या जीवनातील भयानक प्रसंग! ज्यामुळे स्टार स्पिनर हादरला जाणून घ्या एका क्लिकवर

---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला 14 वर्षांच्या वयामध्ये बोट कापण्याची धमकी मिळाली होती. आर अश्विनने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 765 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. तसेच आता रविचंद्रन अश्विनने इंटरनॅशनल क्रिकेट मधून संन्यास घेतला आहे. रविचंद्रन अश्विनसाठी एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचणे सोपे नव्हते. अवघ्या 14 वर्षांच्या वयामध्ये त्याला हाताचे बोट कापण्याची धमकी मिळाली होती.

क्रिकबज सोबत बातचीत करताना रविचंद्रन अश्विनने या गोष्टीचा खुलासा केला आहे तो म्हणाला तो लहान असताना टेनिस बॉल  स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विरोधी संघाने त्याला धमकी दिली होती. संघातील काही खेळाडूंनी त्याला धमकी दिली आणि म्हणाले की तू जर अंतिम सामना खेळलास तर आम्ही तुझे बोट कापू.

अश्विन म्हणाला माझा मित्र मला टेनिस बॉल स्पर्धा खेळण्यासाठी सांगत होता. पण माझ्या वडिलांना हे आवडत नव्हते. अश्विन म्हणाला मी जेव्हा 14-15 वर्षांचा होतो तेव्हा त्या स्पर्धेदरम्यान काही मुले माझ्याजवळ आली मी विचारले कोण आहात ? तेव्हा ते म्हणाले की तू अंतिम सामना खेळत आहेस ना? आम्ही तुला घ्यायला आलो आहोत. त्यांनी मला गाडीवर बसवले आणि एका चहाच्या दुकानावर आणले. त्यानंतर अश्विन त्या मुलांना म्हणाला अंतिम सामना चालू होणार आहे मला जायचे आहे. तेव्हा ती मुले त्याला म्हणाली आम्ही विरोधी संघाकडून आहोत आणि आम्ही तुला अंतिम सामना खेळू देणार नाही. जर तू खेळलास तर आम्ही तुझे बोट कापू.

पुढे अश्विनने सांगितले की, त्या मुलांनी मला धमकावल्यानंतर मी त्यांना मला घरी सोडा असे सांगितले. माझ्या सारख्या म्हणल्यानंतर त्यांनी मला घरी सोडले. वडिलांनी विचारले की ती मुले कोण होती तेव्हा मी आधी मित्र आहेत सांगितले. पण नंतर खरं काय ते सांगून टाकले.

रविचंद्रन अश्विनने भारतीय संघासाठी काही सामने जिंकून दिले आहेत. रविचंद्रन अश्विनने 106 कसोटी सामन्यांमध्ये 537 विकेट्स घेतल्या आहेत आणि 3503 धावा सुद्धा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 6 शतके आहेत. त्यातील त्याची सर्वोत्तम खेळी 124 धावा आहे. अश्विन 8 वेळा सामन्यात 10 व त्याच्यापेक्षा जास्तही विकेट्स घेतल्या आहेत. आर अश्विनने 116 वनडे सामन्यात 156 विकेट्स तसेच 65 टी20 इंटरनॅशनल सामन्यात 72 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने वनडे सामन्यात 707 धावा आणि टी20 इंटरनॅशनल सामन्यात 184 धावा केल्या आहेत. याचबरोबर 211 आयपीएल सामन्यात अश्विनने 180 विकेट्स घेतल्या आहेत आणि 800 धावा सुद्धा केल्या आहेत.

हेही वाचा 

पाकिस्तानकडून भारतीय संघाला जबरदस्त टोला, माजी खेळाडूने दिले खुले आव्हान!

रणजी ट्रॉफी स्पर्धेचे आजपर्यंतचे विजेते, पाहा संपुर्ण यादी

न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघात मोठा बदल, टॉस नंतर काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा ?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---