सध्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा टी20 सामना सेंट जॉर्ज पार्क येथे रंगला आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाने 125 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले आहे.
या सामन्यात आफ्रिकन कर्णधार एडन मार्करमने (Aiden Markram) टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. जो संघासाठी योग्य ठरला. प्रत्युत्तरात भारताकडून सलामीला आलेले फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) लवकरच तंबूत परतले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनने (Marco Jansen) पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर पहिल्या टी20 सामन्यात शतक मारलेल्या संजू सॅमसनला पव्हेलियनचा रस्ता दाखवत भारतीय संघाला पहिला धक्का दिला.
अभिषेक शर्माही 4 धावांवर तंबूत परतला, तर कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) संघासाठी चमकदार कामगिरी करू शकला नाही. तो देखील 4 धावा करून स्वस्तात तंबूत परतला. भारतासाठी हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सर्वाधिक धावा केल्या. पांड्याने 45 चेंडूत 39 धावांची शानदार खेळी केली. दरम्यान त्याने 4 चौकारांसह 1 गगनचुंबी षटकार ठोकला. तिलक वर्मा 20, अक्षर पटेल 27, रिंकू सिंह 9, अर्शदीप सिंगच्या 7 धावांच्या जोरावर भारतीय संघाने 6 गडी गमावून 124 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, कर्णधार एडन मार्करम आणि न्काबायोमझी पीटर यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवत संघासाठी मोलाचे योगदान दिले.
दोन्ही संघांची प्लेइंग 11-
भारत- संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान
दक्षिण आफ्रिका- रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, न्काबायोमझी पीटर
महत्त्वाच्या बातम्या-
संघाला मोठा झटका, टी20 मालिकेतून बाहेर पडला ‘हा’ अष्टपैलू खेळाडू!
बॉर्डर-गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाचे हे 5 खेळाडू ठरू शकतात भारतासाठी डोकेदुखी
रोहितच्या अनुपस्थितीत बुमराह भारतीय संघाला मिळवून देणार यश? माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य