मुंबई । इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची टी -20 आंतरराष्ट्रीय मालिका संपल्यानंतर बाबर आझम व्हाईट वॉश टी -20 ब्लास्ट खेळण्यासाठी समरसेटला परतला. पाकिस्तान वनडे क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने समरसेटसाठी पहिला सामना खेळला. दरम्यान एक मोठा वाद सुरू झाला. समरसेटच्या जर्सीमध्ये प्रायोजित लोगो आहे, त्यातील एक लोगो दारूच्या ब्रँडचा आहे. हाच लोगो बाबरच्या जर्सीवर असल्याने पाकिस्तानी क्रिकेट चाहते भडकले.
या सामन्यात बाबरने वॉर्स्टरशायरविरुद्ध 42 धावा फटकावल्या, पण त्याच्या धावांपेक्षा त्याच्या जर्सीबद्दल जास्त चर्चा होत आहे. बाबरच्या जर्सीवर मद्य कंपनीचा लोगो पाहून चाहते संतप्त झाले. हा लोगो चुकून बाबरच्या जर्सीवर आल्याचे समोर आले. हा लोगो पुढील सामन्यापासून बाबर आझमच्या जर्सीवर दिसणार नाही, असे समरसेटने सांगितले.
समरसेटच्या सलामीच्या सामन्यात बाबरने 35 चेंडूत 42 धावा फटकावल्या. तसेच सलामीवीर स्टीव्हन डेव्हिसने 60 धावांची खेळी साकारली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर समरसेटने वॉर्स्टरशायरसमोर 20 षटकांत 230 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात वॉर्स्टरशायरचा 6 धावांनी पराभव झाला. गेल्या वर्षी व्हिएलिटी ब्लास्टमध्ये बाबरने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 149.35 च्या स्ट्राईक रेटने 52.54 च्या सरासरीने 578 धावा केल्या. ज्यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जगभरातील सर्वच कसोटी सामन्यात एकाच चेंडूचा वापर करावा; पहा कुणी केली मागणी
पाकिस्तानची पायाभरणी करणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा पणतू आहे आयपीएल संघाचा मालक
धोनीच्या निवडीबाबत माजी प्रशिक्षकाचे मोठे विधान; म्हणतात, गांगुलीची इच्छा…
ट्रेंडिंग लेख –