fbpx
Thursday, January 21, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्याध्यापकांशी भांडून वडिलांनी त्याला खेळायला पाठवले आणि…

The Story of Indian Cricketer Shivam Mavi

September 16, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ KKRiders

Photo Courtesy: Twitter/ KKRiders


२०१८ चा एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक न्यूझीलंडमध्ये होत होता. २०१६ च्या विश्वचषकात अंतिम फेरीत पराभूत झालेला भारतीय संघ पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वात स्पर्धेत सामील झाला होता. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होता. पृथ्वी शॉ, मनजोत कालरा व शुबमन गिल यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावत भारताला ३२८ धावांची मजल मारून दिली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया चांगला प्रतिकार करेल अशी अपेक्षा असताना, भारताच्या वेगवान गोलंदाजीला पाहून भलेभले क्रिकेटपंडित व समीक्षक आवाक झाले. जगाने कधीही न पाहिलेले भारतीय वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी, इशान पोरेल व शिवम मावी या तिकडीने सातत्याने १४० किमी/प्रतितास इतक्या तुफानी वेगाने गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव २२८ धावांवर गुंडाळला. भारताच्या या संघाने शेवटपर्यंत अजिंक्य राहत विश्वचषक आपल्या नावे केला. पृथ्वी शॉ व शुबमन गिल या फलंदाजांसोबतच शिवम मावी व कमलेश नगरकोटी यांची सर्वांनीच मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यापैकी, शिवम मावीविषयी आपण जाणून घेऊया.

मेरठच्या मवाना तालुक्यातील सीना येथील मूळ रहिवासी असलेले पंकज मावी, गेली पंचवीस वर्ष नोएडामधील सेक्टर ७१ येथे राहतात. सेक्टरमधील गल्लीत शिवमचा खेळ पाहून लोक त्याची वाहवा करत. लोक करत असलेले कौतुक पाहून पंकज यांनी वयाच्या आठव्या वर्षी शिवमला, फुलचंद शर्मा यांच्या वंडर्स क्रिकेट अकादमीत दाखल करण्याचा निर्णय घेतला. घरातील इतरांची इच्छा होती की, शिवमने डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे, मात्र पंकज यांनी शिवमला क्रिकेट खेळवायचे नक्की केले.

शिवमचे पहिले प्रशिक्षक असलेले फुलचंद शर्मा सांगतात,

“जेव्हा शिवम पहिल्यांदा अकादमीत आला तेव्हाच मी त्याचा वेग पाहून अचंबित झालो. १५ वर्षाच्या मुलांप्रमाणे तो गोलंदाजी करत होता. सोबतच, तो क्षेत्ररक्षणही अत्यंत चपळाईने करत. शिवमच्या प्रगतीचा वेग खूप अधिक होता.”

क्लब क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने, प्रशिक्षकांनी त्याला दिल्लीच्या १४ वर्षाखालील संघासाठी ट्रायल देण्यास सांगितले. अपेक्षेप्रमाणे त्याची निवड झाली. पुढील जम्मू काश्मीर दौऱ्यावर त्याला संघात सामील करण्यात आले. त्याला संघात सामील केले गेले मात्र, त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याला सुट्टी देण्यास नकार दिला. अखेर, मुख्याध्यापकांचे म्हणजे डावलून वडिलांनी त्याला जम्मू काश्मीर दौऱ्यावर पाठवले. ती स्पर्धा शिवमने एकहाती जिंकून दिली. पुढे त्याला उत्तर प्रदेशच्या चौदा वर्षाखालील व सोळा वर्षाखालील संघात स्थान दिले गेले.

शिवमच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत, त्याच्या परिवाराचे व वरिष्ठ खेळाडूंचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्याची बहीण शालू त्याच्या खाण्यापिण्याची तसेच वेळेचे नियोजन करण्याचे काम करते. पंजाबचा माजी खेळाडू परविंदर अवाना व अनुरीत सिंग यांनी त्याला अगदी पहिल्यापासून मार्गदर्शन केले आहे.

शिवमला पहिल्यांदा संधी देणारी वंडर्स अकादमी नोएडातील सेक्टर-३४ मध्ये स्थलांतरित झाल्यानंतर, भारतीय खेळाडू सुरेश रैना त्याठिकाणी सरावासाठी येत. त्यावेळी सोळा वर्षाच्या शिवमने रैनाला बाद केले होते, तेव्हा रैनाने शिवमची खुल्या मनाने तारीफ केली.

युवा विश्वचषक गाजवत असतानाच, २०१८ आयपीएलसाठीचा लिलाव झाला. त्यावेळी अनेक संघांमध्ये शिवमला आपल्या चमूत दाखल करण्यासाठी रस्सीखेच चालू होती. अखेरीस, कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल ३ करोड रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले. पहिलीच आयपीएल त्याने आपल्या वेगाने गाजवली.

२०१८ च्या देशांतर्गत हंगामा,त विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेद्वारे त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सौराष्ट्र विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात हॅट्रिक घेत त्याने विक्रम नोंदवला‌. २०१९ हे दुखापतीने वाया गेल्यानंतर, यावर्षी तो आयपीएलमध्ये युएईतील मैदाने गाजवण्यास तयार आहे.

ब्रेट ली, इयान बिशप या दिग्गजांच्या म्हणण्यानुसार, शिवममध्ये भारतीय गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. भविष्यात शिवम या दिग्गजांच्या म्हणण्यावर खरा उतरतो का ? हे पाहणे रंजक ठरेल.

वाचा-

-काय सांगता! एकाच सामन्यात टाकल्या गेल्या होत्या चक्क ७ चेंडूंच्या ३ ओव्हर

-भल्याभल्या गोलंदाजांना रडवणारा द्रविड ‘त्याची’ खेळी पाहून आला होता रडकुंडीला

-जेव्हा मुंबई इंडियन्सच्या ड्वेन ब्रावोसाठी अंबानींनी जमैकाला पाठवले थेट प्रायव्हेट जेट


Previous Post

मुंबईच्या भारतीय तिकडीतील ‘या’ खेळाडूला मिळाली दुखापतीतून प्रेरणा, म्हणतोय आता काही….

Next Post

राजस्थानच्या दिग्गज खेळाडूचे यंदाच्या हंगामात खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BBL
क्रिकेट

व्हिडिओ: धाव घेताना फलंदाजाची गोलंदाजांशी घातक टक्कर, त्यानंतर घडलं असं काही की तुम्ही कराल कौतुक

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/ virendersehwag
क्रिकेट

स्वागत नहीं करोगे? आपल्या गावात परतल्यानंतर टी नटराजनचे मिरवणूक काढून जंगी स्वागत

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

भारतीय संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘हा’ प्रमुख खेळाडू बाहेर 

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

“आयपीएल २०२१ मध्ये कोलकाताचा संघ सर्वोत्तम प्रदर्शन करेल”, प्रशिक्षकांनी व्यक्त केला विश्वास

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/mipaltan
क्रिकेट

आमचा, आपला मलिंगा! मुंबई इंडियन्सचे निवृत्ती घेतलेल्या लसिथ मलिगासाठी खास ट्विट, पाहा व्हिडिओ

January 21, 2021
Photo Curtsey : Twitter/ICC
क्रिकेट

तूम खेल के बारे में क्या जानते हो! भारताला इंग्लंडपासून सावध राहण्याचा सल्ला देणारा दिग्गज फॅन्सकडून ट्रोल

January 21, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ rajasthanroyals

राजस्थानच्या दिग्गज खेळाडूचे यंदाच्या हंगामात खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम

युवा प्रतिभावान क्रिकेटर दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बोर्डाचे वाढले टेन्शन

Photo Courtesy: Twitter/IPL

माजी दिग्गज म्हणतो, वॉटसन 'या' दोन गोलंदाजांविरुद्ध कसा खेळतो, पाहावे लागेल

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.