पुढच्या महिन्यात श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. उभय संघांत तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. वनडे मालिका 10 जानेवारी रोजी सुरू होणार असून पुढच्या आठवड्यात या मालिकेसाठी संघ घोषित होऊ शकतो. माहितीनुसार कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा या मालिकेतून संघात पुनरागमन करतील. मंगळवारी वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाईल, असेही सांगितले जात आहे. वनडे मालिकेपूर्वी उभय संघांतील टी-20 मालिका पार पडणार आहे.
वनडे मालिकेत रोहित, बुमराह आणि जडेजा करणार पुनरागमन
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेविषयी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने संघातील खेळाडूंच्या फिटनेसविषयी माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, “रोहित शर्मा (Rohit Sharma) अजून 100 टक्के फिट झाला नाहीये. आम्ही दुखापतीविषयी कुठलीच जोखीम घेऊ इच्छित नाहीत. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी मात्र एनसीएमध्ये पुनरागमन केले आहे. जर ते फेटनेस चाचणीत पास झाले, तर संघात निवड होण्यासाठी ते उपलब्ध असतील. पण वनडे क्रिकेटचा लोड पाहता रोहित लवकरच या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करेल. आम्ही सध्या टी-20 क्रिकेटवर अधिक लक्ष देत आहोत.”
“जडेजा आणि बुमराह दोघेही पूर्णपणे फिट आहेत. ते दोघेही चांगले प्रदर्शन करत आहेत. बुमराहने पूर्णवेळ गोलंदाजी सुरू केली आहे. जडेजाने देखील फुन्हा गोलंदाजीला सुरूवात केली आहे. हे दोघेही निवड करण्यासाठी तयार आहेत. पण ते टी-20 फॉरमॅटमध्ये त्यांचे पुनरागमन होईल की नाही, हा निवडकर्त्यांचा निर्णय आहे. त्यांचे पुनरागमन घाईत होणार नाही,” असेही या अधिकाऱ्याने सांगितले. वनडे मालिकेपूर्वी भारत आणि श्रीलंका संघात टी-20 मालिका खेळली जाणार आहे. उभय संघांतील ही मालिका 3 जानेवारी रोजी सुरू होईल. हार्दिक पंड्या या संघात नेतृत्व करताना दिसेल, असेही सांगितले जात आहे. (The team for the series against Sri Lanka will be announced on Tuesday! Rohit, Bumrah and Jadeja can make a comeback)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“कर्णधार एक सांगतो अन् खेळाडू करतात एक”, संघ सहकारीच टीम इंडियावर भडकला
पेले यांची तब्येत नाजूक, जवळचे व्यक्ती करतायेत हॉस्पिटलमध्ये गर्दी; मुलीची भावूक पोस्ट व्हायरल